आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीला दिल्या झोपेच्या गोळ्या, मग प्रियकराला बोलावून केले हे महापाप; पोलिसांनी गुप्तहेर लावून असे पकडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जैसलमेर - राजस्थानात एका रस्त्यावर सापडलेल्या मृतदेहाच्या चौकशीत पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली आहे. गुप्तहेर लावून केलेल्या तपासात पोलिसांनी रविवारी पीडित युवकाच्या पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. 20 ऑगस्ट रोजी जैसलमेरच्या एका गावातील हायवेवर पोलिसांना एक बेवारस बाइक आणि युवकाचा मृतदेह सापडला होता. तो मृतदेह रुपसी गावातील तुलछारामचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सुरुवातीला हे प्रकरण अपघाताचे असल्याचा भास झाला होता. परंतु, पीडित युवकाच्या भावाने हत्येची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुप्तहेर लावून तपास सुरू केला. परिणामी पत्नी आणि प्रियकाराला अटक करण्यात आली आहे. 


गुप्तहेर लावून असे पकडले...
प्रथमदृष्ट्या हे प्रकरण अपघाताचे वाटत होते. परंतु, घटनास्थळाचा बारकाइने तपास केला असता तुलछारामला अपघातामुळे दुखापत झाली असावी किंवा बाइक अपघातात त्याचा मृत्यू झाला असावा असे मुळीच वाटत नव्हते. यानंतर पोलिसांनी कुटुंबियांशी संवाद साधला. तेव्हा पीडित युवकाचा भाऊ किशनाराम याने हत्येची तक्रार दाखल केली. पोलिसांनी खूनीचा शोध घेण्यासाठी काही गुप्तहेर पेरले होते. यात त्यांना तुलछारामच्या पत्नीवर संशय आला. तिला अटक करून कसून चौकशी केली तेव्हा आपला प्रियकर जोरारामसोबत मिळून पतीचा खून केला अशी कबुली तिने दिली. 


2011 पासून सुरू होते अफेअर
> आपला गुन्ह्याची कबुली देताना आरोपी महिलेने संपूर्ण प्रकरणाचा खुलासा केला आहे. महिलेने सांगितले, की 2011 पूर्वीच तिचा तुलछारामशी साखरपुडा झाला होता. तरीही साखरपुड्यानंतर ती गावातील जोराराम नावाच्या युवकातच्या प्रेमात पडली. दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते आणि लग्नाचाही निर्णय घेतला होता. परंतु, आधीच साखरपुडा झाल्याने तिच्या कुटुंबियांनी त्यास तीव्र विरोध केला. यानंतर सामाजिक दबावातून तिने तुलछारामशी विवाह केला. 
> तुलछारामशी विवाह झाल्यानंतरही तिने जोरारामला सोडलेले नव्हते. वारंवार माहेरी राहून आणि त्याला आपल्या पतीच्या गावी बोलावून ती भेटत होती. आपल्या पत्नीचे दुसऱ्या एका पुरुषासोबत विवाहबाह्य संबंध असल्याची शंका तुलछारामला आली होती. यानंतर झालेल्या भांडणावरून पत्नी माहेरी गेली होती. याच दरम्यान तिने आपल्या पतीला ठार मारण्याचा कट रचला.


माहेरी बोलावून दिल्या झोपेच्या गोळ्या, मग...
> माहेरीच राहत असताना प्लॅननुसार आरोपी महिलेने आपल्या प्रियकराकडून झोपेच्या गोळ्या मागवल्या. यानंतर आपला पती तुलछारामला फोन करून एकटे माहेरी बोलावले. जवळच्याच गावात असलेला तुलछाराम बाइकने आपल्या सासरवाडीत गेला. 
> पती घरी आल्यानंतर अगदी चलाखीने आरोपी महिलेने त्याला आणि आपल्या कुटुंबियांना सुद्धा झोपेच्या गोळ्या दिल्या. पतीसह घरातील सगळेच गाढ झोपेत गेल्याची खात्री करून तिने प्रियकर जोरारामला घरी बोलावले. दोघांनी मिळून झोपेतच तुलछारामचा खून केला. 


हत्येला अपघात दाखवण्याचा प्रयत्न फसला
आरोपी महिला आणि जोरारामने ठरल्याप्रमाणे हत्येला अपघाताचे स्वरुप दिले. यासाठी ते आपल्या गावापासून 3 किमी दूर एका हायवेवर पतीची बाइक घेऊन पोहोचले. यानंतर एका निर्जनस्थळी हायवेवर तुलछारामची बाइक आणि काही अंतरावर रस्त्याच्या कडेला त्याचा मृतदेह फेकून दिला. परंतु, पोलिसांना पहिल्याच दिवशी घटनास्थळाचे बारकाइने निरीक्षण केले असता हा अपघात नसून हत्या असल्याचे उमगले. 

बातम्या आणखी आहेत...