Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | Wife names missing in husband's name

पत्नीच्या नावे चिठ्ठी लिहून पती आई-वडिलांसह बेपत्ता

प्रतिनिधी | Update - May 17, 2019, 11:13 AM IST

जळगावातील घटना, पोलिसांनी केली नाेंद

  • Wife names missing in husband's name

    जळगाव - ‘प्रिय रूपाली, तुझ्या इच्छेप्रमाणे मी आणि माझे आई-वडील आम्ही हे घर सोडून जात आहोत. तुझी इच्छा पूर्ण हाेवो ही सदिच्छा. तुझा आणि फक्त तुझाच दीपक. कृपया आमचा तपास करू नकोस, आम्ही मेलो तुला सोडून.’ पत्नीच्या नावाने असा मजकूर लिहून एक तरुण आपल्या आई-वडिलांसह घर सोडून निघून गेला. १३ मे रोजी जळगावातील श्रीधरनगरात ही घटना घडली असून १५ रोजी उघडकीस आली. या प्रकरणी पत्नीने दिलेल्या माहितीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. दीपक आत्माराम सोनगिरे (३६) त्यांचे वडील आत्माराम (६०) व आई रजनी (५५) अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत. दीपक एमआयडीसीतील एका कंपनीत नोकरीस आहेत. पत्नी रूपाली या ब्यूटीपार्लरचे काम करतात. रूपाली मावस बहिणीच्या लग्नासाठी १२ मे रोजी धरणगाव येथे गेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सायंकाळी दीपक धरणगाव येथे डिंपलच्या हळदीला जाणार होता. त्यानुसार रूपाली यांनी त्यांना फोन केला; परंतु फोन लागला नाही. त्यांनी घरी जाऊनही पाहिले, परंतु तिथेही कुणी नव्हते. म्हणून त्या पुन्हा श्रीधरनगरात आल्या.


    १५ मे रोजी घर उघडले
    दोन दिवस पुन्हा फोन तसेच अन्य मार्गाने शोधाशोध केली आणि १५ मे रोजी त्यांनी दुसऱ्या चावीने घर उघडले. या वेळी घरात एक डायरी उघडी करून ठेवलेली दिसून आली. दरम्यान, या प्रकरणाची पोलिसांनी नाेंद केली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Trending