वीर पत्नी / Inspirational: भारताच्या शहीद वैमानिकाची विधवा हवाई दलात होणार सामिल, एसएसबी परीक्षेत झाली उत्तीर्ण

5 महिन्यांपूर्वीच मिराज-2000 क्रॅशमध्ये शहीद झाले होते समीर अब्रोल

दिव्य मराठी वेब

Jul 16,2019 10:35:00 AM IST

नवी दिल्ली - मिराज-2000 क्रॅशमध्ये शहीद झालेले भारतीय हवाई दलाचे वैमानिक समीर अब्रोल यांच्या विधवा आता हवाई दलात सामिल होणार आहेत. 5 महिन्यांपूर्वी झालेल्या क्रॅशमध्ये स्क्वाड्रन लीडर समीर अब्रोल यांचा मृत्यू झाला होता. आता त्यांच्या पत्नी गरीमा अब्रोल यांनी सर्व्हिस सलेक्शन बोर्डाची परीक्षा (एसएसबी) उत्तीर्ण केली आहे. त्या लवकरच हवाई दलात सामिल होणार आहेत. रिटायर्ड एअर मार्शल अनिल चोप्रा यांनी सोमवारी ट्वीट करून यासंदर्भातील माहिती दिली.


चोप्रा यांनी सांगितल्याप्रमाणे, गरिमा आधी तेलंगणाच्या दुंदिगल एअरफोर्स अकादमी जॉइन करतील. यानंतर 2020 मध्ये त्यांना हवाई दलात सहभागी केले जाणार आहे. त्यांनी गरीमा आणि समीर या दोघांचा एक फोटो ट्वीट केला आहे. त्यामध्ये गरीमा यांचा अनन्यसाधारण क्षमतेची महिला असा उल्लेख केला आहे. सर्वच महिला एकसारख्या नसतात. काही जवानांच्या वीर पत्नी देखील असतात. असेही त्यांनी लिहिले आहे.


बंगळुरूत याच वर्षी 1 फेब्रुवारी रोजी प्रशिक्षणार्थी विमान मिराज-2000 अपघातग्रस्त झाले होते. यात दोन वैमानिक शहीद झाले. ही दुर्घटना हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) विमानतळावर घडली होती. विमानात स्क्वाड्रन लीडर समीर अब्रोल यांच्यासोबत स्क्वाड्रन लीडर सिद्धार्थ नेगी देखील होते. अपघाताच्या वेळी दोन्ही वैमानिकांनी एमरजेंसी एक्झिट करून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, एकाचा विमानाच्या ढिगारावर पडल्याने मृत्यू झाला. तर दुसऱ्या वैमानिकाने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. या अपघाताची अजुनही चौकशी सुरू आहे.

X
COMMENT