आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंजेक्शनमुळे गेला रूग्णाचा बळी, डॉक्टरांनी फेटाळले आरोप; कोणीही नव्हते आले मदतीला, अखेर पत्नीने अशाप्रकारे मिळवला न्याय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सूरत - पांडेसरा येथे महेश भूरा प्रसाद शर्मी यांना मृ्त्यूनंतर शनिवारी न्याय 11 वाजता न्याय मिळाला. येथील भाजपा नगरसेवक डॉ. डीएम वानखेडे यांच्या साई क्लिनीकमध्ये इंजेक्शन दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. आपल्या पतीला न्याय मिळावा यासाठी महेशची पत्नीने उपोषण करत कँडल मार्ज काढला होता. त्यानंतर डॉक्टर वानखेडे यांनी याप्रकरणामध्ये तडजोड करण्याची सहमती दर्शविली होती. मृतकाच्या पत्नीला 3 लाख आणि त्यासोबतच पेंशनसाठी 8 लाख रूपये एसआयमध्ये जमा करण्यासाठी तयार झाले. 

 

नर्सने इंजेक्शन दिल्यानंतर महेश झाला होता मृत्यू 

शुक्रवारी डॉ. डीएम वानखेडे यांच्या साई क्लिनीकमध्ये छातीत दुखत असल्यामुळे एका रूग्णाचा मृत्यू झाला. त्यावेळी रूग्णालयात कोणतेच डॉक्टर हजर नव्हते. अशातच तेथे उपस्थित असलेल्या नर्सने त्याला एक इंजेक्शन दिले. त्यानंतर लगेच रूग्ण रक्ताच्या उलट्या करत बाहेर आला आणि तिथेच कोसळला. थोड्यावेळाने त्याचा मृत्यू झाला. यामुळे कुटुंबीयांनी रूग्णालयात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. कुटुंबीयांनी युवकाच्या मृत्यूला रूग्णालयातील कर्मचाऱ्यांना कारणीभूत ठरवले होते.

 

न्याय मिळवून देण्यासाठी समाजाने घेतला पुढाकार
महेशच्या पत्नीला न्याय मिळवून देण्यासाठी लोक दिवसभर मदत करत होते. समाजसेवक अजय सिंह राजपूत यांनी सांगितले. की, या प्रकरणाबाबत चर्चा करण्यासाठी कोणताच अधिकारी येथे आला नाही. जनप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी माणुसकी तरी दाखवायला हवी होती. 

 

पत्नी : आता जगात माझे कोणीच नाही 
महेशच्या पत्नीने सांगितले की, आता या जगात माझे कोणीच राहिले नाही. मला माझ्या अस्तित्वाची लढाई लढावी लागणार आहे. याआधी शनिवारी महेशची पत्नी गुडिया न्याय मिळावा यासाठी उपोषणाला बसली होती. न्याय मिळेपर्यंत मी अन्न-पाणी ग्रहण करणार नसल्याचे तिने सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...