आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीची हत्या करण्यासाठी रोज पाहायची क्राइम पेट्रोल, असा प्लान केला की पोलिसही सुन्न झाले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर - टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या क्राइम पेट्रोल सारख्या  बहुतांश क्राइम शोमध्ये अपराध रोखण्याचा संदेश दिला जातो. पण काही लोक या शोमधील आयडिया वापरूनच गुन्हे करत असत्ता. छत्तीसगडमधील असेच एक प्रकरण नुकतेच समोर आले आहे. राजनांदगाव येथील एका महिलेला तिच्या पतीची हत्या करायची होती. त्यासाठी ती रोज क्राइम पेट्रोल पाहायची. तिने नोकर आणि मुलांनाची तिच्या प्लानमध्ये सहभागी करून घेतले. त्यानंतर तिने पतीला मारण्यासाठी असा काही कट रचला की पोलिसही सुन्न झाले. 


प्रकरणाचा तपास केल्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार मृत प्रेम सायमन त्याची पत्नी अँजेलिना आणि मुलांचा रोज छळ करत होता. त्याच्या रोजच्या छळाला कंटाळल्यामुळे अखेर त्याच्या पत्नीने त्याची हत्या करण्याचा निर्णय घेतला. पण हत्या करायची कशी हा प्रश्न तिच्यासमोर होता. मग त्यासाठी तिने मदत घेतली टीव्हीवरील क्राइम शोची. हत्येची पद्धत शिकण्यासाठी ती रोज मुलांना सोबत घेऊन क्राइम शो पाहायची. 


पोलिसांना 52 वर्षीय सामयन यांचा मृतदेह मुढीपार रेल्वे ट्रॅकवर मिळाला होता. पोलिसांनी हत्येच्या संशयावरून गुन्हा दाखल केला होता, पण त्यांच्या हाती काही लागत नव्हते. पण पोलिसांनी मंगळवारी त्याची पत्नी अँजेलिना अल्पवयीन मुलगा-मुलगी आणि नोकर हरिश्चंद्रला अटक केली. सायमनचे दुसऱ्या महिलेशी अवैध संबंध होते. त्यामुळे तो रोज पत्नी आणि मुलांना मारहाण करायचा त्याला कंटाळून त्याची हत्या केल्याचे अँजेलिनाने मान्य केले आहे. 


असे उघड झाले प्रकरण 
सायमन याचा मृतदेह मिळाल्यानंतर त्याचे पोस्ट मॉर्टर्म करण्यात आले. त्यात त्याच्या डोक्यावर आणि छातीवर धारदार आणि वजनदार शस्त्राने वार केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी नोकर हरिश्चंद्रला ताब्यात घेत चौकशी केली. त्यावेळी त्याने गुन्हा मान्य केला. तसेच यात अँजेलिना आणि मुलेही सहभागी असल्याचे ासंगितले. खोलीत झोपलेल्या प्रेमवर मुलाने कुऱ्हाडीने डोक्यावर तर हरिश्चंद्र आणि प्रीतमने छातीवर वार केले. त्यात प्रेमचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी प्रेमचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर फेकला. 

 

मृतदेहाची विल्हेवाट
या घटनेनंतर प्रेमच्या  मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी अँजेलिनाने त्यांचे शेजारी प्रताप यांची कार मागितली होती. त्यानंतर त्यांनी नोकर हरिश्चंद्र आणि प्रीतम यांच्या मदतीने मृतदेह रेल्वे ट्रॅकवर फेकले. त्यानंतर हत्येसाठी वापरलेले रॉड, कुऱ्हाड, रक्ताने माखलेली चादर हेही नदीत फेकून दिले.   

बातम्या आणखी आहेत...