आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवदर्शनासाठी गेले होते नवदाम्पत्य, नवरा पार्किंगमधील गाडी आणण्यासाठी गेला असता पत्नीने प्रियकरासोबत ठोकली धुम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर- लग्नानंतर पतीसोबत देवदर्शनाला गेलेली नवविवाहिता प्रियकरासोबत पळून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. अहमदनगर जिल्ह्यात ही घटना घडली. तीन दिवसांपूर्वी लग्न झालेले नवदाम्पत्य देवदर्शनासाठी मढी कानिफनाथला गेले होते. त्याठिकाणी प्रियकर आधीच आला होता. पती पार्किंगमध्ये गाडी काढण्यासाठी गेला असता, संधी साधून नवी नवरी प्रियकरासोबत पळून गेली. दरम्यान हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कॅद झाला आहे.


नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील एका तरुणाचे तीन दिवसांपूर्वी लग्न झाले होते. सर्व कार्य संपवून नवदाम्पत्य देवदर्शनाला गेले. पण नवरीचे आधीच एका मुलासोबत प्रेमप्रकरण असल्यामुळे तिचा प्रियकर आधीच तिथे आला होता. नवदाम्पत्य मढी कानिफनाथला देवदर्शनाला गेल्यानंतर, नवरदेवाने आपली गाडी पार्किंगमध्ये लावली होती. देवदर्शन झाल्यानंतर गाडी पार्किंमधून काढण्यासाठी गेला. ही संधी तिथे आधीच आलेल्या नवरीच्या प्रियकराने साधली. त्याने आपल्या विवाहित प्रेयसीला आपल्या गाडीवर बसवले आणि ते दोघे पसार झाले. हा सर्व प्रकार देवस्थानच्या cctv कॅमेऱ्यात कैद झाला.