आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Wife Ran Away With Nephew Husband Goes Police Station For File Adultery Complaint

अवैध संबंधांत भाच्यासोबत पळून गेली मामी, घटना कळताच मामाला बसला जबरदस्त Shock

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर -  शहर पोलिसांत एका पतीने धाव घेतली. त्याने आपली बेपत्ता असल्याची तक्रार दिली. तो पोलिसांना म्हणाला की, त्याच्या भाच्यानेच आपल्या पत्नीला म्हणजे मामीला पळवून नेले आहे. हे ऐकून पोलिसही अवाक झाले. पतीने तक्रार दिल्याच्या काही वेळानेच त्याची पत्नीही पोलिस स्टेशनला हजर झाली. ती जे काही म्हणाली त्याने पोलिस आणखीनच बुचकळ्यात पडले. वास्तविक, महिला स्वत:हूनच गायब झाली होती. महिलेला तिच्या पतीसोबत जाण्यास सांगण्यात आले, तेव्हा तिने स्पष्ट नकार दिला.

 

असे आहे पूर्ण प्रकरण...
सूत्रांनुासर, विवाहितेचे आपल्या 21 वर्षीय भाच्यासोबत अवैध संबंध आहेत. यामुळे तिला आता पतीसोबत राहायचे नाही. महिलेने पोलिसांना सांगितले की, तिने अनेक वेळा पतीला घटस्फोट द्यायला सांगितले, पण त्याने दिला नाही. शेवटी मीच भाच्यासोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला. 

 

मामीचे भाच्यासोबत अवैध संबंध
लग्नानंतर विवाहितेचे पतीच्या भाच्यासोबत अवैध संबंध प्रस्थापित झाले. तिने भाच्याला बहकवून पळवून नेल्याचाही आरोप होत आहे. आता महिला म्हणते की, तिने भाच्यासोबत लग्न केले आहे आणि तिला त्याच्यासोबतच राहायचे आहे.


अजूनही पतीला परत पाहिजे पत्नी...
दुसरीकडे, विवाहितेचा पती म्हणतोय की, त्याला अजूनही पत्नीला सोबत ठेवायचे  आहे. त्याचे म्हणणे आहे की, त्याच्या पत्नीला भुरळ पडल्याने ती असे बोलत आहे. त्याला अजूनही पत्नी परत पाहिजे आहे, परंतु पत्नीने स्पष्ट नकार दिला आहे.


पोलिस म्हणतात- दोघेही सज्ञान, कारवाई होणार नाही
याप्रकरणी पोलिस म्हणतात की, महिला आणि तिचा भाचा दोघेही सज्ञान आहेत. यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाऊ शकत नाही. शिवाय अवैध संबंधांवर नुकताच सुप्रीम कोर्टाचाही निर्णय आला आहे. तथापि, पळून गेलेल्या महिला दोन लहान मुले आहेत. आता तिचा माजी पतीच त्यांचा सांभाळ करतोय. 

 

 

बातम्या आणखी आहेत...