आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

67 वर्षीय पतिला हवी होती किडनी, मुला-मुलीचीही किडनी झाली मॅच, पण आई म्हणाली मी किडनी देते, जगले तर ठिक नसता त्यांच्याबरोबरच जाईल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोगा - परमजित कौर यांच्या 67 वर्षीय नवऱ्याला 25 वर्षापासून मधुमेह आहे. त्यामुळे दोन वर्षापूर्वी त्यांच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या. त्यांना वाचवण्यासाठी किडनी ट्रान्सप्लान्टशिवाय दुसरा पर्याय नव्हता. डाॅक्टरांनी बलबीर यांच्यासाठी किडनी दात्यांचा शोध सुरू केला. पण त्यांना यश येईना.

 

डॉक्टरांनी परमजीत कौर, मुलगा नवनीत आणि मुलगी मनजित यांच्या किडनीची तपासणी केली. तिघांच्याही किडनी बलदेव यांच्या किडनीशी जुळल्या. पण परमजित यांनी मुलांना सांगितले की, त्याच बलबीर सिंग यांना किडनी देणार. तुम्ही तुमचे आयुष्य जगा, मी जग पाहिले आहे. ऑपरेशन यशस्वी झाले तर मग परत भेटूच नाहीतर तुमच्या वडिलांसोबत माझेही जाणे योग्य राहील असेही त्या म्हणाल्या. 

 

 

>> परमजित कौर यांनी आपली एक किडनी देऊन नवऱ्याचा जीव वाचवl पत्नी धर्म निभावला. सध्या दोघांची प्रकृती ठीक असून ते डॉक्टरांच्या निगराणीत आहेत. परमजित यांची मुलगी मनदीप कौर यांनी ही गोष्ट शेअर केली आहे.

>> त्यांनी सांगितले की, त्यांच्या वडिलांना 1993 पासुन मधुमेहाचा त्रास होता. 2016 मध्ये त्यांच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या. तेव्हापासून ते डायलिसिसवर होते. 

>>  मोगा, भटिंडा तसेच डीमसी लुधियाना येथे त्यांना उपचारासाठी नेले होते परंतु काही उपयोग झाला नाही. किडनी प्रत्यारोपण हा एकमेव मार्ग शिल्लक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

>> बराच काळ किडनीचा शोध घेतला. पण त्यांना यश आले नाही. डॉक्टरांनी कुटुंबीयांच्या किडनी मॅच होतात का हे तपासले. त्यावर सर्वांची किडनी मॅच होत होती. पण अखेर बलवीर यांच्या पत्नी परमजित यांनीच किडनी डोनेट करण्याचा निर्णय घेतला. 23 सप्टेंबर रोजी ऑपरेशन यशस्वी झाले आणि वडिलांचे प्राण वाचले.  

 

बातम्या आणखी आहेत...