आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॅलेंटाइन डेचे गिफ्ट म्हणून नवऱ्याकडे पाठवली सेक्स वर्कर, नंतर नवऱ्याने दिलेले गिफ्ट पाहून हादरुनच गेली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून एक शॉर्ट फिल्म चांगलीच व्हायरल होत आहे. या शॉर्टफिल्ममध्ये एका नवरा बायकोची स्टोरी दाखवण्यात आली आहे. यामध्ये पत्नीला पतीला व्हॅलेंटाइनसाठी काहीतरी खास गिफ्ट द्यायचे असते. असे जे आजवर कोणत्याही बायकोने तिच्या नवऱ्याला दिलेले नसेल असे. त्यावर तिच्या भावाच्या सांगण्यावरून ती एक विचित्र गिफ्ट नवऱ्याला पाठवते. त्याचा परिणामही अत्यंत गंभीर असा होता. 


नेमकी काय आहे कथा..
>> Wrong Gift नावाची ही शॉर्ट फिल्म सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. 
>> यात, व्हॅलेंटाइन डे जवळ आल्याने पत्नी पतीला म्हणते आपला 10 वा व्हॅलेंटाइन डे आहे, तर तू मला काय गिफ्ट देणार आहेस. 
>> पती तिला म्हणतो आजवर मीच तुला व्हॅलेंटाइनला गिफ्ट देत आलो आहे. यावेळी मला तुझ्याकडून एखादे असे गिफ्ट हवे आहे जे कोणीही विचार केले नसेल. जे आधी कोणत्याही पत्नीने पतीला दिलेले नसेल. 
>> पतीला असे काय गिफ्ट द्यावे हेच तिच्या मनात सुरू असते. त्याचवेळी तिच्या भावाच्या सांगण्यावरून पत्नी एक धाडसी निर्णय घेते. ती व्हॅलेंटाइन डेसाठी तिच्या पतीसाठी एका सेक्स वर्करची व्यवस्था करते. 
>> व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी पती जेव्हा पत्नीला गिफ्ट मागतो तेव्हा पत्नी त्याला गिफ्ट बेडरूममध्ये असल्याचे सांगतो. 
>> पती जेव्हा बेडरूममध्ये जातो, तेव्हा त्याला तेथे ती सेक्स वर्कर दिसते. पती तिला पाहून काहीसा गोंधळून जातो. तो बाहेर येऊन पत्नीला विचारतो. पण पत्नी त्याला हेच तुझे गिफ्ट असल्याचे सांगते. 
>> त्यानंतर पती बेडरूममध्ये जातो आणि सेक्स वर्करबरोबर मजा करतो. 
>> या प्रकारानंतर पत्नी पैसे देऊन त्या सेक्स वर्करला हाकलून लावते आणि पतीला माझे गिफ्ट कुठेय असे विचारते. 
>> पती तिला म्हणतो लवकरत चुला गिफ्ट मिळेल.
>> नंतर पती पत्नीला बेडरूममध्ये तिचे गिफ्ट ठेवले आहे असे सांगतो. पत्नी आत जाऊन पाहते तर त्याने घटस्फोटाचे पेपर्स ठेवलेले असतात. 
>> पत्नी यावरून पतीला जाब विचारले. त्यावर पती तिला म्हणतो, तू जे केलेस ते कोणतीही पत्नी करू शकत नाही. तू मला गमावले आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...