आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking:प्रियकरासाठी मच्छरासारखे मारले नवऱ्याला, जीव जाईपर्यंत तोंडात मारला Mosquito Sprey

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - येथील बंजारा हिल्स परिसरातील फिल्म नगर येथे हादरवून सोडणारी घटना घडली आहे. याठिकाणी पत्नीने नवऱ्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. नवऱ्याला मारण्यासाठी पत्नीने त्याच्या तोंडात मच्छर मारण्याचा स्प्रे कोंबला आणि नवरा मरेपर्यंत ती त्याच्या तोंडात स्प्रे करत राहिली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. 


मृताचे नाव जगन असल्याची माहिती मिळाली आहे. जगन हा खासगी क्षेत्रात नोकरी करत होता. सोमवारी रात्री तो मद्यधुंद अवस्थेत घरी आला त्यानंतर त्याचे पत्नीशी वाद झाले. या वादातून पत्नीने त्याची तोंडात मच्छर मारण्याचा स्प्रे त्याच्या तोंडात कोंबला. त्यानंतर तो मरेपर्यंत ती त्यांच्या तोंडात स्प्रे करत राहिली. त्यातून तो जागीच ठार झाला. मात्र मीडिया रिपोर्ट्समध्ये पत्नीच्या विवाहबाह्य संबंधातून ही हत्या झाल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच पत्नीच्या प्रियकरालाही पोलिसांनी अटक केल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...