पती Touch करत / पती Touch करत नव्हता, मृत्यूआधी पत्नीने लिहिली चिठ्ठी- मेल्यानंतरही स्पर्श करू देऊ नका

दिव्य मराठी वेब टीम

Oct 25,2018 12:02:00 AM IST

लग्नाआधी तरुणींच्या सासरकडून मोठ्या अपेक्षा असतात. परंतु त्या वास्तवात येतातच असे नाही. दररोज हुुंडाबळीच्या घटना आपण पाहतो. अशीच एक घटना गतवर्षी देशाच्या राजधानीत घडली होती, ज्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. एका विवाहितेने सासरच्या मंडळींच्या छळाने त्रस्त होऊन घरातील पंख्याला ओढणीचा गळफास लावून आत्महत्या केली. मृत विवाहितेजवळ एक चिठ्ठी आढळली. यात सासरच्यांनी केलेल्या छळाबाबत लिहिले होते. चिठ्ठीत असेही लिहिले की, तिच्या मृत्यूनंतर सासरच्यांनी तिचा मृतदेहाला स्पर्शही करू नये.

असे आहे प्रकरण...
ही घटना उत्तर दिल्लीतील सराय रोहिल्ला परिसरातील आहे. मृत विवाहितेचे नाव निधी बन्सल (32) असे होते.
- पोलिस सूत्रांनुसार, निधी बन्सल तिचा पती अतुल बन्सलसह शास्त्रीनगरमध्ये राहत होती. दोघांचे लग्न 4 डिसेंबर 2013 रोजी झाले होते. लग्नानंतर काही वर्षांनी दोघांत भांडणे होत होती.
- सूत्रांनुसार, लग्नाच्या 4 वर्षांपर्यंत अतुलने निधीशी संबंध बनवले नव्हते. यामुळे त्यांच्यात दररोज वाद होत होता.
- त्रस्त होऊन तिने घराच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या खोलीत पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.
- यानंतर घरातील सदस्यांनी निधीला लटकलेले पाहिल्यावर शेजाऱ्यापाजाऱ्यांना गोळा केले.
- घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांना मृत निधीजवळ एक सुसाइड नोट आढळली, यात तिने सासरच्यांनी केलेल्या छळामुळे आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.
- तिने लिहिले की, पतीमुळेही खूप त्रस्त होते. पतीने कधीच स्पर्शही केला नाही. यामुळे मृत्यूनंतरही मृतदेहाला सासरच्या कोणालाच हात लावू देऊ नका.
- घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टामॉर्टमनंतर नातेवाइकांना सोपवला.

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

X
COMMENT