आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'वाइफ स्वॅपिंग'च्या प्रकरणातील पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांबाबत अशी माहिती मिळाली की ती गेली डिप्रेशनमध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानपूर येथील एका महिलेने डिप्रेशनमध्ये जात थेट आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. कुटुंबीयांनी वेळीत पाहिल्यामुळे महिलेला फासावरून उतरवत लगेच रुग्णालयात नेल्याने तिचा जीव वाचला. अडीच वर्षांपूर्वी महिलेने पतीच्या विरोधात अनैसर्गिक सेक्सचा आरोप करत पोलिस ठाण्यात 'वाइफ स्वॅपिंग' ची तक्रार दिली होती. बुधवारी तिला समजले की, चौकशीदरम्यान अनेक आरोपींच्या नावावरील गंभीर कलमे हटवले असल्याचे या महिलेला समजले. त्यामुळे तिला प्रचंड धक्का बसला आणि तिने फाशी घेत जीव आत्महत्येचा प्रयत्न केला. 


अनैसर्गिक सेक्स आणि वाइफ स्वॅपिंगचा आरोप 
- 2015 मध्ये कानपूरच्या एका तरुणीचा विवाह उरई येथील तरुणाशी झाला होता. पीडितेने आरोप केला होता की, लग्नानंतर सासरचे लोक महागडी कार आणि 35 लाखांची मागणी करत होते. पण पीडितेच्या कुटुंबाला एवढी मोठी रक्कम देणे शक्य नव्हते. तिच्या पतीचा अनेक ठिकाणी रियल इस्टेटचा मोठा व्यवसाय आहे. 
- डिमांड पूर्ण न केल्याने पती तिच्याबरोबर अननॅचरल सेक्स आणि मारहाण करत होता, असा पीडितेचा आरोप आहेत. त्याचबरोबर तो महिलेला मित्रांबरोबर संबंध ठेवण्यासाठी भाग पाडत होता. 
- पती बळजबरी 'वाइफ स्वॅपिंग' (पत्नींची अदला-बदली) चा खेळ खेळत होता असाही आरोप आहे. त्यामुळे पत्नीने 2016 मध्ये पोलिसांत तक्रार दिली होती. त्या तक्रारीवर पोलिस जवळपास अडीच वर्षांपासून चौकशी करत आहेत. 


पतीने पोलिसांना त्याच्या बाजुने वळवून घेतल्याचे समजताच गेली डिप्रेशनमध्ये 
सुत्रांच्या मते, पोलिसांनी आरोपीशी हातमिळवणी करत कट कारास्थान आणि गँगरेप सारखी कलमे हटवली आणि आरोपींना क्लीनचीट दिल्याचे पीडितेला समजल्यानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली. तिच्या कुटुंबीयांनी सांगितले की, तिला हे सहन झाले नाही आणि तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. 


पोलिसांचे म्हणणे काय ?
पोलिसांनी सांगितले की, तपासात अश्लिल फोटो काढून दबाव आणल्याचे सिद्ध झाले नाही. पोलिसांचे म्हणणे आहे की, पीडितेने याबाबत काहीही पुरावे दिले नाहीत. त्याच आधारे या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. 

बातम्या आणखी आहेत...