आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगा नपुंसक असताना विवाह करून सुनेचा छळ; पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा, पंढरपुरातील घटना  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर- मुलगा नपुंसक असताना त्याचे लग्न लावून विवाहितेचा हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी पंढरपूर शहरातील उमेश विरधे यांच्यासह त्यांची पत्नी , मुलगा , मुलगी यांच्यासह अन्य एक अशा एकूण पाच विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांच्याच सुनेने तक्रार दिली आहे. दरम्यान, आपला पती नपुंसक असून लग्नाच्या पहिल्या दिवसापासून एकदाही त्याने शारीरिक संबंध ठेवले नसल्याचे विवाहितेने तक्रारीत म्हटले आहे. 

 

उमेश विरधे यांचा मुलगा सिद्धिविनायक याचा विवाह जून २०१८ मध्ये सायलीशी झाला होता. लग्नाच्या दुसऱ्या दिवसांपासून सिद्धिविनायकसह उमेश विरधे, सासू उज्ज्वला विरधे , नणंद प्रियंका भट , चुलत सासरे सुरेश विरधे यांनी सायलीचा शारीरिक, मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. क्षुल्लक कारणावरून सायलीला हे सर्व जण शिवीगाळ करणे, टोमणे मारणे असे प्रकार करत होते. तर दुसरीकडे पती सिद्धिविनायक हा पत्नी म्हणून आपल्या जवळही येत नव्हता. तो नपुंसक असल्याचे लक्षात आले. मात्र, ही बाब लपवून ठेवण्यासाठी सर्वांनी तिला ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान, पती नपुंसक असल्याने सायलीने तक्रार दिल्यानंतर पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...