आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्यांदा प्रेग्नंट झाली होती महिला, डिलिव्हरीपूर्वी झालेल्या स्कॅनमध्ये सगळं काही होत ठीक, काही तासानंतर महिलेने दिला एका मुलीला जन्म, नंतर डॉक्टरांनी जे सांगितले के ऐकून घाबरली महिला...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिशिगन- अमेरिकेत राहणारी एक महिला जेव्हा पहिल्यांदा प्रेग्नंट झाली, तेव्हा कपलने घरातच डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला. तण त्यांची ही प्लॅनिंग तेव्हा फेल झाली, जेव्हा प्रेग्नंसीच्या 34 व्या आठवड्यात अचानक महिलेच्या पोटातील पाण्याची पिशवी फुटली आणि तिला रूग्णालायात घेउन जावे लागले. अंदाजे 48 तासांच्या लेबर पेननंतर महिलेने एका मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर जेव्हा नर्स टाके लावण्याची तयारी करत होती, तेव्हा उपस्थीत नर्स आणि इतर स्टाफला महिलेच्या पायाखाली पाहून धक्का बसला. तेथे त्यांना एक डोके दिसले, जे त्या महिलेच्या दुसऱ्या बाळाचे होते. खरतर ती महिला जुळ्या मुलांना जन्म देणार होती, आणि काही वेळानंर तिने मुलाला जन्म दिला.


- ही स्टोरी अमेरिकेच्या ग्रँड हेवेन शहरात राहणाऱ्या निकोल जिस्मर(31) आणि मॅथ्यू जिस्मर(34) ची आहे. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये 34 आठवड्यांच्या प्रेगन्सीनंतर अचानक निकोलच्या पोटातील पाण्याची पिशवी फाटली आण तिला तातडीने रूग्णालयात घेऊन जावे लागले.


- त्यानंतर अंदाजे 48 तासांच्या लेबर पेननंतर महिलेने मुलगी ब्लेकलेला जन्म दिला. त्यानंतरही तिच्या वेदना कमी होत नव्हत्या, वेदनेमुळे ती खुप त्रस्त झाली होती. ती डॉक्टरांना म्हणत होती, 'असे वाटत आहे, जसे कोणीतरी आहे पोटात.'


- डिलिव्हरीच्या काही वेळानंतर जेव्हा नर्स स्टाफे साफ-साफाई करण्यासाठी आली, तेव्ही तिला महिलेच्या पोटात अजून एक डोके दिसले. 


- पहिल्या डिलिव्हरीनंतर अंदाजे 59 मिनिटांनी निकोलने दुसऱ्या बाळाला जन्म दिला. यावेळी तिने मुलाला जन्म दिला आणि त्याचे नाव कॅड ठेवले. आश्चर्याची बाब म्हणजे डिलिव्हरीपूर्वी महिलेच्या पोटाचे स्कॅनिंगदेखील झाले होते, पण त्यातही फक्त एकच बाळ दिसले. डॉक्टर म्हणाले, बहुतेक स्कॅनच्यावेळी मुलगा आपल्या मुलीच्या मागे गेला असावा. 


डॉक्टरांचे म्हणने ऐकून घाबरली महिला
- महिलेने सांगितले, 'आम्हाला दुसऱ्या बाळाबद्दल काहीच माहित नव्हते, मला तर पहिल्या बाळाला पाहूनच अश्रू आले. खरतर हे खुप घाबरवणारे होते, जेव्हा डॉक्टरांनी माझ्या पोटात काहीतरी असल्याचे सांगितले आणि जेव्हा त्यांनी आम्हाला दुसऱ्या मुलाबद्दल सांगितले तेव्हा त्या खोट तर बोलत नाहीयेत ना असे वाटले.'


- प्रेग्नंसी पिरीयडदरम्यान महिलेचे कोणतेही स्कॅन झाले नव्हते, ती नैसर्गिक प्रसुतीची वाट पाहात होती, पण 48 तास होउनही डिलिव्हरी झाली नाही तेव्हा तिने ऑपरेशनची परवानगी दिली. त्यानंतर 30 डिसेंबरला रात्री 10 वाजता तिने मुलीला जन्म दिला आणि त्याच्या तासाभरानंतर मुलगाही जन्मला.


- महिलेने सांगितले की, माझ्या कुटुंबात जुळे किंवा तिळ्यांची परंपरा आहे. निकोलच्या आजीनसुद्ध जुळे आणि तिळ्यांना जन्म दिला होता.

 

पुढील स्लाइडवर पाहा फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...