आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाली (राजस्थान) - 30 जुलैच्या रात्री केराराम चौधरीवर गावठी कट्ट्यातून फायरिंग केल्याच्या घटनेचा खुलासा पोलिसांनी केला आहे. एसपी राहुल प्रकाश म्हणाले, पाव-भाजीची गाडी चालवणारा केराराम जिल्ह्यातील खौड गावाचा रहिवासी आहे. पत्नीच्या अवैध संबंधांमुळे त्याने तिला घटस्फोट दिलेला आहे. असे असूनही पत्नीने त्याच्या घरावर बळजबरी कब्जा केलेला आहे. यामुळे त्रस्त होऊन केराराम एकटा राहू लागला. पतीची संपत्ती हडपण्यासाठी पत्नी तिजोने प्रियकर शिवलालच्या मदतीने पृथ्वी वाल्मिकी आणि लालाराम यांना 1 लाख रुपयांची सुपारी देऊन पतीच्या हत्येचा कट रचला. पृथ्वी आणि लालारामने 30 जुलै रोजी दुकानातून घरी परतताना केरारामवर गोळीबार केला, परंतु गोळी त्याच्या बाइकच्या हँडलवर लागली आणि छर्रे त्याच्या हातात घुसले. तिजोच्या सांगण्यावरूनच शिवलालने यापूर्वीही 2 वेळा केरारामवर हल्ला केला होता, परंतु तो वाचला.
गोळीबार करणाऱ्यांनी पतीला मागितली 7 लाख रुपयांची खंडणी
घटनेनंतर जेव्हा केराराम वाचला तेव्हा आरोपींना वाटले की, केराराम भेदरलेला आहे, त्याला घाबरवून आणखी पैसे उकळता येतील. यामुळे केरारामला फोन करून त्यांनी दम दिला आणि म्हणाले की, 3 वेळा तू वाचला आहेस, पण आता वाचणार नाहीस. 14 ऑगस्ट रोजी पुन्हा फोन करून म्हणाला की, 17 ऑगस्टची रात्र त्याच्या आयुष्याची शेवटची रात्र असेल. जर तुला जीव वाचवायचा असेल, तर 7 लाख रुपये दे.
आधी खुलेआम गुन्ह्यावर गुन्हा, पकडल्यावर घेतला घुंघट
पतीची सुपारी देऊन जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपी पत्नीला पोलिसांनी जेव्हा इतर आरोपींसोबत फोटो काढण्यासाठी आणले तेव्हा तिला गुन्ह्याची जाणीव झाली. पोलिस म्हणाले- घूंघट काढून फोटो काढा. आरोपी पत्नी म्हणाली- घूंघटमध्येच ठीक आहे.
प्रत्येक वेळी नशिबाने दिली पतीची साथ
- पत्नीची बेवफाईमुळे त्रस्त केरारामने गाव सोडले आणि नाडोलमध्ये पाव-भाजीची दुकान चालवू लागला. नशिबाने प्रत्येक वेळी त्याची साथ दिली. 3 वेळा जीवघेण्या हल्ल्यांतून तो वाचला.
- केरारामच्या एफआयआरवर पोलिसांनी पत्नी तीजो, तिचा प्रियकर शिवलाल आणि गोळ्या झाडणारे दोन्ही सुपारी किलर यांना अटक केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.