murder / अडीच एकर जमिनीसाठी पत्नीचा विष पाजून खून; गुन्हा दाखल

पतीसोबत वाद होत असल्याचने पत्नी राहायची माहेरी, सासरी आल्यानंतर पतीने केला खून 

प्रतिनिधी

Jul 12,2019 08:55:00 AM IST

धारुर - अडीच एकर जमिनीच्या तुकड्यासाठी पत्नीचा विष पाजून खून केल्याची घटना कासारी (बो.)येथे घडली. याप्रकरणी पतीसह अन्य एका जणावर दिंद्रूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


धारूर तालुक्यातील कासारी (बो.) येथील बालासाहेब व्यंकटी बडे यांची अडीच एकर जमीन पत्नी राहिबाई यांच्या नावे आहे. पतीसोबत वाद होत असल्याने राहिबाई दोन मुलांसह माहेरी भोगलवाडी येथे राहतात. कधीतरी त्या सासरी जात. दरम्यान, अडीच एकर जमीन आपल्या नावे करुन देण्यासाठी बालासाहेब याने राहिबाईकडे तगादा लावला होता. मात्र, राहिबाई नकार देत असल्याने दोघांत सतत वाद होत. बुधवारी राहिबाई सासरी आल्या असताना पती, पत्नीत वाद झाला. यात बालासाहेब याने पत्नी राहिबाईला विष पाजले. तिला उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. राहिबाई यांचा भाऊ बिभीषण तिडके याच्या तक्रारीवरुन बालासाहेब बडे, दीर शाहू बडे यांच्या विरोधात दिंद्रूड पोलिसांत खुनाचा गुन्हा नोंद झाला.

X
COMMENT