Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Wife's murder for alcohol, life imprisonment for husband

दारूसाठी पत्नीचा खून, पतीला जन्मठेपेची शिक्षा

प्रतिनिधी | Update - Aug 29, 2018, 11:44 AM IST

दारू पिण्यास पैसे देत नाही व घरातील किरकोळ भांडणाच्या कारणावरून वाढेगाव येथील पत्नीचा खून केल्याबद्दल पतीस जिल्हा व सत्र

  • Wife's murder for alcohol, life imprisonment for husband

    सांगोला- दारू पिण्यास पैसे देत नाही व घरातील किरकोळ भांडणाच्या कारणावरून वाढेगाव येथील पत्नीचा खून केल्याबद्दल पतीस जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. मोरे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.


    विजय चव्हाण असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. २७ डिसेंबर २०१३ रोजी विजय याने पत्नी पूनम हिला दारूसाठी पैसे मागितले. तिने ते न दिल्याने किरकोळ भांडण झाले. त्यातून विजयने पूनमवर लोखंडी कुदळीने ठिकठिकाणी वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर तिला जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याबाबत सांगोला पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला.


    मुलाची महत्त्वपूर्ण साक्ष
    फिर्यादी व काही महत्त्वाचे साक्षीदार फितूर झाले. परंतु तीन महत्त्वपूर्ण साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीमुळे आरोपीने गुन्हा केल्याचे शाबित करण्यास महत्त्वाचे ठरले. जन्मदात्या पित्यानेच आईला मारल्याचे १६ वर्षीय मुलगा अजय याने साक्षीत सांगितले. तसेच आरोपीने सांगोला न्यायालयात दिलेला कबुली जबाब महत्त्वाचा ठरला. अजय हा अज्ञान असला तरी त्याची साक्ष विश्वासार्ह असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे न्याय निर्णय सरकार पक्षाने न्यायालयासमोर सादर केले. ते ग्राह्य धरून न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Trending