आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Wig India 2020 : Airbus, 100 Representatives From Around The World With Boeing Came

एअर बस, बोइंगसह जगातील १००० प्रतिनिधी दाखल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - हैदराबादेत ४ दिवसीय नागरी उड्डयन व्यवसाय प्रदर्शन व एअर शो विंग इंडिया २०२० गुरुवारपासून सुरू झाला. हे प्रदर्शन आंतरराष्ट्रीय आहे. या प्रदर्शनात भारतीय बनावटीच्या विमानासह जगभरातील विमानांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. नागरी उड्डयन मंत्रालय व एअरपोर्ट अथॉरिटी आॅफ इंडियाच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. पहिल्या दिवशी बिझनेस टू बिझनेस व बिझनेस टू गव्हर्नमंेट बैठका झाल्या. यात जगभरातील एव्हिएशनशी संबंधित अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला, तर ब्रिटिश पायलट्सनी बेगमपेठ विमानतळावर भारतीय हेलिकॉप्टर ‘सारंग’ व ‘ध्रुव’च्या कसरती दाखवल्या.१५ मार्चपर्यंत चालेल शो

हा एअर शो १५ मार्चपर्यंत चालेल. यात सहभागी होण्यासाठी एअर बस व बोइंगसह जगभरातील कंपन्यांचे १००० प्रतिनिधी आले आहेत. दरम्यान, परदेशी विमानांच्या कसरती असतील. 

बातम्या आणखी आहेत...