Home | International | Other Country | 'WikiLeaks' founder Julian Assange arrested

‘विकिलीक्स’चा संस्थापक ज्युलियन असांजेला अटक; ब्रिटन पोलिसांची इक्वेडोरमध्ये कारवाई

वृत्तसंस्था | Update - Apr 12, 2019, 09:33 AM IST

इक्वेडोरच्या राष्ट्रपतींविषयीची माहिती लीक केल्याचा आरोप

  • 'WikiLeaks' founder Julian Assange arrested
    लंडन - अमेरिकेसह काही देशांतील गोपनीय माहिती तसेच लष्कराशी संबंधित कागदपत्रे उघड करून खळबळ उडवून देणारा ‘विकिलीक्स’चा संस्थापक ज्युलियन असांजे याला ब्रिटन पोलिसांनी अटक केली. इक्वेडोरच्या वकिलातीमधून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. गोपनीय कागदपत्रे जाहीर केल्यानंतर अटकेच्या भीतीने असांजे याने २०१२ मध्ये लंडनमधील इक्वेडोर वकिलातीमध्ये आश्रय घेतला. इक्वेडोरच्या राष्ट्रपतींविषयीची माहिती त्याने लीक केल्याचा आरोप झाल्यावर इक्वेडोर सरकारने त्याला दिलेला आश्रय काढून घेतला होता.

Trending