आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Wildlife Department In Khyber Pakhtunkhwa, Paying Rs 50,000 Fine, Raditional Peshwari SandalsWildlife Department In Khyber Pakhtunkhwa, Paying Rs 50,000 Fine, Raditional Peshwari Sandals

पाकीस्तनाचे पंतप्रधान इम्रान खान यांना देण्यासाठी तयार केली अजगराच्या चमड्यापासून सँडल, व्यक्तीवर लावला 50 हजारांचा दंड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेशावर(पाकिस्तान)- पंतप्रधान इम्रान खान यांना ईदच्या दिवशी भेट देण्यासाठी एका शू मेकरने चक्क अजगराच्या चमड्यापासून तयार केलेली सँडल बनवली, पण इम्रान यांना देण्यापूर्वीच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. खैबर पख्तूनख्वा वन्यजीव विभागच्या अधिकाऱ्यांनी पेशावरच्या जहांगीरपुरा बाजारातील शू मेकर नूरुद्दीनच्या दुकानावर छापा मारून सँडल जप्त केली. विभागाने वाइल्ड लाइफ अॅक्ट अंतर्गत कारवाई करून 50 हजारांचा दंडदेखील लावला आहे. नूरुद्दीनने मीडियाला सांगितले की, "दंड भरल्यानंतर आता मला सँडल परत मिळाली आहे. आता ही सँडल पंतप्रधानांना भेट स्वरुपात देणार." रिपोर्टनुसार, जप्त केलेल्या सँडलला पेशावरमध्ये ‘कप्तान स्पेशल चप्पल’ म्हटले जाते.


सँडलचे सामान अमेरिकेतून आले
नूरुद्दीनने सांगितले की, आमच्याकडे दोन जोडे सँडल तयार करण्याची ऑर्डर होती. सँडल तयार करण्यासाठीचे सामान अमेरिकेतून पाठवले होते. एक जोडी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासाठी होती. तत्पुर्वी, नूरुद्दीन अधिकाऱ्यांना सँडलचे सामान आयात केल्याचा पुरावा देऊ शकला नाही.

 

सँडलला जप्त करण्यासाठी जिल्हा वन अधिकारी (डीएफओ) एक ग्राहक बनून रविवारी दुकानावर आले. त्यांनी पेशावरी सँडल दाखवण्याची मागणी केली. बोलण्या-बोलण्यात शिनवारीने अजगरच्या चमड्यापासून तयार केलेली सँडल दाखवली, त्याला अधिकाऱ्यांनी जप्त केले. कारवाई नंतर सँडलला टेस्ट करण्यासाठी लॅबमध्ये पाठवले.

 

टेस्टमध्ये स्पष्ट झाले की, सँडल अजगराच्या चमड्यापासून तयार केलेली आहे. सोमवारी दंड लावल्यानंतर आणि शपथपत्रावर स्वाक्षरी घेतल्यानंतर सँडल परत करण्यात आली. त्यासोबतच यापुढे प्राण्यांची चमडी न वापरण्याचे आदेशही देण्यात आले.


पाकिस्तानचा वन्यजीव अधिनियम, 2015 च्या अंतर्गत सांपांची विक्री आणि खरेदी करणे कायद्यान्वये गुन्हा आहे. अधिनियमानुसार, कोणालाच लायसेंसशिवाय जंगली प्राणी ठेवण्याची परवानगी नाहीये. 

 

याप्रकरणी खैबर पख्तूनख्वाचे पर्यावरण मंत्री इश्तियाक उरमुर यांनी म्हटले की, "सँडल कोणासाठी तयार केली आहे, याने काहीच फरक पडत नाही. हे एक गुन्हेगारी कृत्य आहे. असे कृत्य यापुढे सहन केले जाणार नाही."