आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'इंडियन आयडॉलच्या सूत्रसंचालनात स्वत:ची स्टाइलदेखील जोडणार'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सिंगिंग रियालिटी शो 'इंडियन आयडॉल ११ चे सूत्रसंचालन या वेळी आदित्य नारायण करताना दिसेल. मागील सीझनचे सूत्रसंचालन मनीष पॉलने केले होते. आदित्यच्या मते, मनीषने खूप सुंदररित्या सूत्रसंचालन केले होते, ते मी आवर्जून पाहत आहे. तथापि, आदित्य कोणतेच जुने तंत्र या वेळी अवलंबणार नाही. या मुलाखतीत आदित्यने शोसंदर्भात काही खास गोष्टी आम्हाला शेअर केल्या...

इंडियन आयडॉलचे प्रेक्षक या सीझनकडून काय खास अपेक्षा बाळगू शकतात?
सरणाऱ्या प्रत्येक वर्षासोबत गुणवत्तेमध्ये आणखीनच बहरत जाते. कारण मागील सीझनमध्ये गायकांद्वारे बनवण्यात आलेला बेंचमार्क उत्तम बनवायचा आहे. इंडियन आयडॉलने नेहमीच चित्रपटसृष्टीला उत्तमोत्तम गायक दिलेले आहेत. त्यामुळे या वेळीही आपल्याला असेच काही उत्तम गायक पाहायला मिळतील. ते स्वत:साठीच नाही तर या शोसाठीही इतिहास रचतील. या सीझनमध्ये गायकांची विविधता दिसून येईल. ते वेगवेगळ्या प्रकारातील म्हणजेच शास्त्रीय आणि सेमी-शास्त्रीय गाणी गाताना दिसतील. आमच्याकडे या सीझनमध्ये भरपूर वैशिष्ट्ये पाहायला मिळतील. एकाच गायनप्रकारामध्ये ज्यांचा हातखंडा आहे, त्यांची गायकी या वेळचे वैशिष्ट्य असेल.

इंडियन आयडॉलमध्ये तू प्रथमच सूत्रसंचालन करताना दिसणार आहेस. आपल्या संघटन कौशल्याबाबत काय सांगशील?
मी इंडियन आडॉल कुटुंबाचा एक हिस्सा झाल्यामुळे खूप उत्साहित आणि आनंदी आहे. मी शाळेत असतानापासून इंडियन आयडॉल पाहत आलो आहे. त्यामुळे या शोमध्ये प्रत्यक्ष काम करताना मला खूप मजा येणार आहे. मी तिसऱ्या सीझनची इत्थंभूत माहिती गोळा केली होती. कारण त्या सीझनमध्ये माझे वडील उदीत नारायण परीक्षक होते. त्या सीझनच्या आठवणी आजही ताज्या झाल्याशिवाय राहत नाहीत.

काही भागांची तू शूटिंग केली आहेस. परीक्षकांसोबत तुझा ताळमेळ कसा आहे?
मी तिन्ही परीक्षकांसोबत चांगल्यारितीने काम करत आहे. अनु मलिकजींबद्दल माझ्या मनामध्ये खूप आदर आहे. कारण त्यांनी मला पहिला ब्रेक दिला होता. विशालजी एक रॉकस्टार आहेत. मला त्यांच्याकडून संगीतातील बरेच काही शिकायला मिळत आहे. तसेच नेहा एक सुंदर मुलगी आहे. त्यामुळे मी तिच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.

शोच्या सूत्रसंचालनासाठी काही खास तयारी करत आहेस का?
मी मागील सीझनचा चांगल्यारितीने अभ्यास केलेला आहे. त्यामुळे मागील सीझनमध्ये सूत्रसंचालनाबाबत जे-जे प्रयोग करण्यात आले होते, त्याची मीदेखील पुनरावृत्ती निश्चितच करेल. तथापि, मनीष पॉलने उत्कृष्ट सूत्रसंचालन केले होते. मनीष आधी जसा होता तसाच स्क्रीनवरही दिसून आला. मी सूत्रसंचालन आणखी मनोरंजक बनवण्यासाठी आपली स्वत:ची स्टाइलदेखील त्यामध्ये जोडण्याचा प्रयत्न करेन.

या सीझनमध्ये येणाऱ्या गुणवंतांबाबत काय सांगशील?
या सीझनमध्ये गुणवंत गायक पाहायला मिळतील. माझा देश मला कधीच निराश करत नाही. आफल्या देशात गुणवत्तेची कमतरता नाही. त्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी केवळ मंच हवा असतो. दर महिन्याला नवीन शो आले तरी संपूर्ण पाहायला मिळणार नाही.