Politics / Ayodhya: पीएम मोदी अन् योगींच्या नेतृत्वात राम मंदिर उभारणार, अयोध्येतून शिवसेना नेते संजय राऊत

निवडणुकीनंतर प्रथमच विजयी खासदारांसह अयोध्या दौरा करणार उद्धव ठाकरे

दिव्य मराठी वेब

Jun 15,2019 11:16:00 AM IST

मुंबई / अयोध्या - पीएम नरेंद्र मोदी आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात राम मंदिर उभारू असे शिवसेनेने शनिवारी अयोध्येत सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. विजयी खासदारांसह ठाकरे रविवारी सकाळी रामलल्लाचे दर्शन घेतील. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी अयोध्येत जाऊन पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना, संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रश्नाचे उत्तर देणे टाळले आहे.

X
COMMENT