Home | Maharashtra | Vidarva | Akola | will contest 48 seats in the state,: Ambedkar

राज्यातील ४८ जागा लढणार, वंचितांना उभे करणार : आंबेडकर

प्रतिनिधी | Update - Aug 03, 2018, 12:06 PM IST

या निवडणुकीत फायदा तिसऱ्याचा म्हणजेच वंचित बहुजन अाघाडीचा होणार आहे.

 • will contest 48 seats in the state,: Ambedkar

  बुलडाणा- राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप या पक्षाने ज्या समाजातील घटकाला वंचित ठेवले आहे. अशा सामाजिक शोषण केल्या गेलेल्या घटकाला एकत्र आणून २०१९ ची लोकसभा लढणार आहोत. या निवडणुकीत फायदा तिसऱ्याचा म्हणजेच वंचित बहुजन अाघाडीचा होणार आहे. राज्यातील ४८ जागा लढणार असून, विधानसभेनंतर बघितल्या जाणार आहे. सध्या लोकसभा हाच विचार असून, वंचितांना उभे करणार असल्याची माहिती अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिली.


  स्थानिक विश्राम भवन येथे आयाेजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी माजी आमदार विजय मोरे, माजी आमदार लक्ष्मण माने, माजी आमदार हरिभाऊ भदे, आमदार बळीराम शिरस्कार, प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, जिल्हाध्यक्ष विष्णू उबाळे, सदानंद माळी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


  या वेळी बाळासाहेब म्हणाले की, भाजपने धनगर समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली होती. त्यामुळे हा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला. मात्र, आता ७ ते ८ महिने शिल्लक राहिले असताना धनगर समाजाला आरक्षण मिळेल याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे धनगर समाज आता भाजपापासून तुटला आहे. धनगर समाजासोबतच मुस्लिम समाजालाही ५ टक्के आरक्षणाची घोषणा या सरकारने केली होती. काँग्रेस,भाजप हे सरकार दुर्बल घटकातील समाजाला न्याय देऊ शकला नाही. या समाजाला न्याय द्यायचा असेल तर आता आम्हाला राज्यकर्ते व्हावे लागेल. त्याकरिता आम्ही दुर्बल घटकातील सर्व समाजाला एकत्रित करून वंचित बहुजन आघाडी स्थापन केली. सध्यास्थितीत आपल्या अपयशावर पर्दा टाकण्याकरिता समाजाची दिशाभूल करत राज्यकर्ते ओबीसी व मुस्लिम समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. समाजा समाजातील गैरसमज दूर करण्याकरिता आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राज्यभर फिरुन दोन समाजांमध्ये संवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत.


  पहिले अधिवेशन २८ सप्टेंबर रोजी
  २८ सप्टेंबर रोजी सोलापूर येथे आघाडीचे पहिले अधिवेशन तर २ आॅक्टोंबर रोजी औरंगाबाद येथे दुसरे अधिवेशन असे राज्यामध्ये १२ अधिवेशन घेतल्या जाणार आहेत. या अधिवेशनाच्या माध्यमातून आरक्षणाची भूमिका, बेरोजगारीचा प्रश्न, शेती, नोकरी, पर्यावरण व शिक्षण या संदर्भातली भूमिका स्पष्ट करणार आहोत. त्यामुळे या संवाद यात्रेच्या माध्यमातून आतापर्यंत विरोधी व सत्ताधारी पक्षांनी ज्या समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला त्या समाजाला आपले मत मांडण्याकरिता त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एक व्यासपीठ निर्माण करून दिले, असे अॅड. आंबेडकर म्हणाले.


  काँग्रेस पक्षाकडून निमंत्रण नाही
  बहुजन आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला प्रस्ताव पाठवला. मात्र, एक महिना उलटुनही काँग्रेसकडून उत्तर मिळाले नाही. बहुजन दुर्बल घटकातील धनगर, माळी, पिडीत ओबीसी, भटक्या विमुक्त व मुस्लिम समाजाला लोकसभेच्या प्रत्येकी दोन जागा, असे राज्यात १२ जागांवर उमेदवारी काँग्रेस पक्षांनी देण्याचे मान्य करावे व काँग्रेस पक्षातील घराणेशाहीला बगल द्यावी, असे झाल्यास आम्ही त्यांच्यासोबत बसायला तयार आहोत. मात्र, राष्ट्रवादी पक्षाला बाजूला ठेवून, अथवा त्यांना काही शर्ती मान्य असतील तर आम्हाला हरकत नाही.

Trending