आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या मंत्र्यांचे खातेवाटप दाेन - तीन दिवसांत : मुख्यमंत्री

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन लाखांवर कर्ज असलेल्यांसाठी नवी योजना आणणार - उद्धव ठाकरे
  • आठ तारखेला अधिवेशन

मुंबई - ‘दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही कोणत्याही अटी-शर्तीविना केली. तसेच ज्या शेतकऱ्यांवर दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज आहे आणि जे नियमित कर्जफेड करत आहेत त्यांच्यासाठी वेगळी योजना आणणार आहोत,’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साेमवारी सांगितले. काहीही काम नसलेले आमच्या कर्जमाफी योजनेची बदनामी करत असल्याची टीकाही त्यांनी भाजपचे नाव न घेता केली. दरम्यान, नव्या मंत्र्यांचे खातेवाटप दोन-तीन दिवसांत केले जाईल, असेही ते म्हणाले.नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक ठाकरेंनी साेमवारी घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. सर्व मंत्री उपस्थित हाेते. ‘जनतेच्या प्रश्नांची चांगली जाण असलेले अनुभवी आणि उत्तम नेते मंत्रिमंडळात अाहेत. ही एक बेस्ट टीम आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकमताने खातेवाटप निश्चित केले आहे. त्यामुळे कोणते खाते कोणाकडे जाणार, याची अधिक चर्चा नको. उद्या किंवा परवा ते कळेलच.’ मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराजी वाढत असल्याच्या प्रश्नावर ठाकरे म्हणाले, ‘माझ्यापर्यंत अद्याप कुणाची नाराजी आलेली नाही. तीन पक्षांचे सरकार असल्याने समतोल साधावा लागत असल्याने सगळ्यांची इच्छा असली तरी ती पूर्ण करू शकत नाही. ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही त्यांना जे द्यायचे आहे ते आम्ही देणारच आहोत.’भाजपने मंत्रिमंडळात घराणेशाही आल्याचा आरोप केला अाहे, या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘आता त्यांच्याकडे दुसरे काम तरी कोणते उरले आहे?  आणि आम्ही जे करतो ते रोखठोकपणाने आणि उघडउघड करतो. वाद घालणे आणि भिंती रंगवणे एवढेच काम आम्हाला नाही.’आठ तारखेला अधिवेशन

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३३४ मधील अनुसूचित जाती-जमातीच्या संदर्भातील राखीव जागांबाबत अनुसमर्थन करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन ८ जानेवारी २०२० रोजी बोलवावे, असे मंत्रिमंडळ बैठकीत ठरल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले
.