आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- तुम्ही जीएसटीअंतर्गत घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण 10 जानेवारीला जीएसटी काउंसिलची बैठक होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्या बैठकीत अंडर-कंस्ट्रक्शन फ्लॅट्सवर जीएसटी कमी करुन 5 टक्क्यांपर्यंत करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच या बैठकीत स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस (एसएमइ)वरील सूट वाढवण्याचाही प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.
10 जानेवारीला आहे जीएसटी काउंसिलची बैठक
एका अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, 10 तारखेला केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली 32 वी जीएसटी काउंसिलची बैठक होणार आहे. त्या बैठकीत रेसीडेंशियल प्रॉपर्टीवरील टॅक्समध्ये बदल करणे, एसएमइच्या थ्रेसहोल्डची मर्यादा 20 लाखांपेक्षा जास्त करणे तसेच अंडर-कंस्ट्रक्शन फ्लॅट्सवरील जीएसटी कमी करुन तो 5 टक्क्यांपर्यंत करणे यासारख्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
आता प्रॉपर्टीजवर आहे 12 टक्के जीएसटी
सध्या अंडर-कंस्ट्रक्शन प्रॉपर्टी किंवा रेडी टू मुव्ह इन फ्लॅट्सवर 12 टक्के जीएसटी आकरला जातो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.