आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PUNE: पंचनाम्‍यानंतर मदत देणार- पालकमंत्री गिरीश बापट, अनेक भागांत उद्या पाणीबाणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मुठा कालव्‍याची भिंत कोसळल्‍याने 40 ते 50 हजार लोकसंख्‍येच्‍या वस्‍तीत पाणी शिरले आहे. ज्‍या झोपडपट्ट्यांमध्‍ये पाणी शिरले आहे, त्‍या भागात पंचनामे करून मदत दिली जाईल, असे आश्‍वासन पुण्‍याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले आहे.

 

सिंहगड रस्‍त्‍यावरील दांडेकर पुलाजवळ सकाळी 11 वाजून 15 मिनिटांनी मुठा कालव्‍याची भिंत कोसळल्‍याने येथील पर्वती भागात अक्षरश: हाहाकार उडाला आहे. येथील रस्‍ते पुर्णपणे पाण्‍याखाली गेले असून अनेक घरांना तडे गेले आहेत. दांडेकर पुल परिसरात अनेकांचे संसार पाण्‍यात वाहून गेले.  त्‍यानंतर मनपा प्रशासनाने तातडीने घटनास्‍थळी रूग्‍णवाहिका आणि अग्निशमन दलाला रवाना केले.

 

पाण्‍याचा प्रश्‍न निर्माण होणार नाही
कालवा फुटल्‍याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. मात्र यामुळे कोणताही पाण्‍याचा प्रश्‍न निर्माण होणार नाही, असे गिरीश बापट यांनी सांगितले आहे. 'यावर्षी पुण्यात पाऊस भरपूर झाला आहे. जवळपास 90% धरणे भरली आहेत. त्‍यामुळे पाण्‍याची समस्‍या निर्माण होणार नाही, असे त्‍यांनी सांगितले आहे.


उद्या अनेक भागांत पाणीपुरवठा बंद
पुण्‍याच्‍या महापौर मुक्‍ता टिळक यांनी कालव्‍याच्‍या दुरूस्‍तीबाबत पाटबंधारे विभागाला मनपाने वारंवार सुचना केल्‍या होत्‍या, असे सांगितले आहे. याविषयी स्‍पष्‍टीकरण देताना गिरीश बापट म्‍हणाले, 'मुठा कालव्याची गेल्या काही वर्षांपासून दुरुस्ती टप्प्या-टप्प्याने करत होतो. मात्र त्या ठिकाणी आज भराव खचल्याने कालवा फुटला' सध्‍या मुख्य खडकवासला धरणातून पाणी बंद करण्यात आले आहे. हा कालवा 111 किलोमीटर लांबीचा आहे, अशी माहितीही गिरीश बापट यांनी दिली. दरम्‍यान 111 किमीचा हा कालवा फुटल्‍याने पुण्‍यात तात्‍पुरती आणीबाणी निर्माण झाली आहे. पुण्‍यातल्‍या अनेक भागांत उद्या पाणीपुरवठा बंद असणार आहे.  

 

 

 

बातम्या आणखी आहेत...