आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ देणार नाही, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतला संकल्प

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात भाजपचा सीएम नको, काँग्रेस नेते दलवई यांनी घेतली राउत यांची भेट
  • कुठल्याही परिस्थितीत भाजपचा मुख्यमंत्री होऊ देणार नाही - हुसेन दलवई

मुंबई - राज्यात राष्ट्रपती शासन लागू होऊ देणार नाही असा संकल्प काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतला आहे. काँग्रेसचे नेते हुसेन दलवई यांनी शिवसेना खासदार संजय राउत यांची बुधवारी भेट घेतली. या भेटीत राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करून ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. कुठल्याही परिस्थितीत भाजपचा मुख्यमंत्री होऊ देणार नाही असेही यावेळी बोलताना दलवई यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यावर अंतिम निर्णय घेतली असेही ते पुढे म्हणाले आहेत.

राजकीय हालचालींना वेग, बुधवार ठरला राजकीय नेत्यांच्या भेटी-गाठींचा दिवस

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून 12 दिवस उलटल्यानंरही सरकार स्थापनेचा पत्ता नाही. त्यातच बुधवारी यासंदर्भात अचानक राजकीय भेटी-गाठींना वेग आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची भेट घेतली. यानंतर काही वेळातच शिवसेना खासदार संजय राउत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन आपण सरकार स्थापित करणार नाही असे स्पष्ट केले. सोबतच, आपला पक्ष एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणूनच भूमिका बजावणार असे जाहीर केले. त्यातच काँग्रेसचे नेते हुसेन दलवई यांनी आता संजय राउत यांची भेट घेऊन पुन्हा चर्चा केली.

बातम्या आणखी आहेत...