आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा वेगवेगळ्या पद्धतीने सहा ठिकाणी लग्न करण्याची होती इच्छा, पहिले लग्न आजोबांच्या घरात व्हावे असे होते मनी, निक जोनसशी आणखी सहा वेळा लग्न करणार का प्रियांका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 36 वर्षाच्या प्रियांका चोप्राने आता 10 वर्षांनी लहान असणाऱ्या निक जोनससोबत लग्न केले आहे. 1 डिसेंबरला ख्रिश्चन पद्धतीने तर 2 डिसेंबरला हिंदू पद्धतीने त्यांचा विवाह झाला. पण तुम्हाला माहिती आहे का, की प्रियांकाला एक, दोन नाही तर चक्क सहावेळा लग्न करण्याची होती. 'सात खून माफ' (2011) या चित्रपटामध्ये सातवेळा सात वेगवेगळ्या लोकांशी लग्न केलेल्या प्रियंकाने 2013 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला सहा वेगवेगळ्या पद्धतीने लग्न करण्याची इच्छा आहे. मात्र त्यासोबतच ती हेही म्हणाली होती की, खऱ्या आयुष्यात प्रत्येकवेळी तिचा जोडीदार एकच असेल.  

 

आजोबांच्या घरात करायचे होते पहिले लग्न.. 
प्रियांका म्हणाली होती, " माझे पहिले लग्न माझ्या आजोबांच्या अंबाला येथील घरी होईल आणि ते पूर्णतः भारतीय पद्धतीचे लग्न असेल". दुसऱ्या लग्नाविषयी प्रियांका म्हणते, "माझे दुसरे लग्न ऑस्ट्रेलियामधील ग्रेट बॅरिअर रिफ येथे पाण्याच्या खाली व्हावे". पुढे तिने सांगितले, तिसरे लग्न टिपिकल नसेल कारण ते लॉस अँजेलिसच्या एका चर्च मध्ये डकिंग ट्रेडीशनने होईल. यामध्ये मी ब्लॅक कलरचा शॉर्ट ड्रेस घालेन". प्रियांकाने आपले चौथे लग्नही चर्चमधेच होईल असे सांगितले. ती म्हणाली, स्वित्झरलँडच्या एका छोट्या पण सुंदर चर्चमध्ये इंटिमेट सेरेमनी होईल. या सोहळ्यामध्ये जवळचे मित्र मैत्रिणी आणि कुटुंबातील सदस्य असतील." 

 

प्रियंकाने निकाह करण्याची इच्छाही व्यक्त केली होती.. 
प्रियांकाने आपले पाचवे लग्न मुस्लिम पद्धतीने होईल अशी इच्छा व्यक्त केली होती. ती म्हणाली होती, पाचव्या वेळी मी निकाह करेन. तो एक रोमँटिक आणि सुंदर सोहळा असेल. दोघांमध्ये एक पडदा असेल, मग चोरून नजरानजर होईल, मग बोलणे होईल आणि शेवटी 'कबूल है' असे म्हणत हा निकाह संपन्न होईल". त्यांनतर सहावे लग्न तिच्या जोडीदाराच्या इच्छेप्रमाणे होईल असे तिने सांगितले होते. 

 

वास्तविक प्रियांकाने आता दोन पद्धतीने लग्न केले आहे. पण त्यापैकी एकही तिने व्यक्त केलेल्या या इच्छेप्रमाणे झाले नाही. मग आता प्रियांका निकसोबत अजून सहा वेळा लग्न करणार का? 

 

बातम्या आणखी आहेत...