Home | International | Other Country | Will teach Yoga in 370 schools in England

इंग्लंडमध्ये प्राणायामाने मुलांची मानसिक अवस्था सुधारणार; इंग्लंडच्या 370 शाळांमधून प्राणायम विषय शिकवणार 

वृत्तसंस्था | Update - Feb 14, 2019, 11:22 AM IST

विद्यार्थ्यांना हुशार बनवण्यासाठीचे तंत्र शिकवणार 

  • Will teach Yoga in 370 schools in England

    लंडन- इंग्लंड सरकारने विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासासाठी शाळेच्या अभ्यासक्रमात माइंडफुलनेस नावाचा नवा विषय घेण्यात आला आहे. याअंतर्गत प्राणायाम शिकवला जाणार आहे. यामुळे त्यांना मन:शांती मिळणार आहे. या विषयानुसार त्यांना हुशार बनवण्याचे तंत्रही शिकवण्यात येईल. प्रारंभी देशातील ३७० शाळांमधून हा अभ्यासक्रम सुरू केला जात आहे. शाळेत मुलांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्यात येणार आहे. शाळेच्या व्यवस्थापनाने मुलांच्या संपूर्ण मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे, हा यामागचा उद्देश आहे.

    इंग्लंड सरकार हे मेंटल हेल्थ ट्रायल २०२१ पर्यंत राबवणार आहे. यापासून निघणारे निष्कर्ष पाहून अभ्यासक्रमात सकारात्मक बदल करण्यात येतील. यामुळे मुलांची मानसिक अवस्था खूप चांगली करण्यास मदत होईल. इंग्लंडच्या शिक्षणमंत्री डॅमियन हिंड्स म्हणाल्या, एक समाज म्हणून आम्ही आपल्याला होणाऱ्या त्रासाबद्दल खूप जागरूक झालो आहोत. मात्र, यामुळे मुलांवरही मानसिक ताण वाढला आहे. तो दूर करण्यासाठी काही खास उपाययोजना नाही. परंतु प्राणायामामुळे मुलांच्या आयुष्यात खूप फरक पडेल. यासाठी आम्ही पाठ्यक्रमात नवा विषय दिला आहे.

Trending