आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर राममंदिराबाबत इतर पर्यायही पडताळू; भाजप सरचिटणीस राम माधव यांचे सूतोवाच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- राममंदिराबाबत सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयाला विलंब होत असेल तर सरकार इतर पर्यायांवरही विचार करू शकते, असे संकेत भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी दिले आहेत. राम मंदिरासाठी विधेयकाचा पर्याय नेहमीच उपलब्ध होता, असेही ते म्हणाले.

 

अयोध्या वादावर सुप्रीम कोर्टात ४ जानेवारीला सुनावणी होणार आहे. राम माधव म्हणाले, कोर्ट फास्ट ट्रॅक कोर्टासारखे काम करेल, अशी अाशा आहे. मात्र असे झाले नाही तर आम्ही इतर पर्यायांवर विचार करू. मात्र त्यांनी हे कोणते पर्याय असतील, याचे संकेत दिले नाहीत. राहुल गांधींबाबतच्या एका प्रश्नावर ते म्हणाले, त्यांचे रिपोर्ट कार्ड तयार करणे काँग्रेसचे काम आहे. राहुल यांचे नेतृत्व फायदेशीर आहे की नाही, याचा निर्णय त्यांचेच नेते करू शकतात. तीन राज्यांत त्यांच्याच नेतृत्वात काँग्रेसला यश मिळाले आहे, त्याचे श्रेय त्यांना दिले जाऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...