आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण जाहिरातींमध्ये दिसत आहेत. यातील त्यांचा अवखळपणा इतका स्वाभाविक वाटतो की, त्यातून त्यांच्या संबंधांतील मधुरता जाणवते. एका दुसऱ्या जाहिरातीत रणबीर कपूर व कॅटरिना कैफ एकमेकांना छेडत आहेत. यातील संवादाचा आशय असा की, रणबीर विषाणूप्रमाणे आहे, जो कधीच मरत नाही. जो आतड्यांना चिकटून राहतो तसेच हे विषाणू व अमीबा यांची प्रजननक्रिया इतकी वेगवान आहे की एक मेला तर हजारो लगेच तयार होतात. संजय लीला भंसाळींच्या ‘सांवरिया’तून रणबीर कपूरने आणि ‘ओम शांति ओम’मधून दीपिका पदुकोणने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. दोन्हीही एकदाच प्रदर्शित झाले. यांच्या निर्मात्यांमध्ये परस्पर आकस असला तरी हे दोघे मात्र प्रेमाच्या झुल्यावर स्वार होते, विविध पार्टीमध्ये सामील होत आनंद व्यक्त करीत होते. केवळ नीतू सिंह यांच्या विरोधामुळे रणबीर कपूर आणि दीपिकाचे नाते पुढे गेले नाही. कारण त्यांना दीपिकाच्या डोक्यावरचे नायिकेचे भूत उतरत ती एक गृहिणी बनेल यावर शंका होती. जसे राज कपूर यांच्या मुलांचे वडिलांपेक्षा आई कृष्णा कपूरसोबत जवळचे संबंध होते तसेच रणबीरचे आहे, कारण रणबीर मोठा होण्याच्या काळात ऋषी कपूर हे खूप व्यग्र अभिनेते होते. सध्या रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या प्रेमसंबंधाबद्दल बोलले जाते व हे नाते आई नीतू कपूरला पसंत आहे. बहुतेक डिसेंबरमध्ये त्यांचा विवाहही होईल. आलियाला रणबीरच्या दीपिका, कॅटरिना यांच्यासोबत जाहिरातींवर कोणताच आक्षेप नाही. तसेच दीपिकाचा पती रणवीर सिंहला याबद्दल काही वाटत नाही. जर प्रेमात विश्वास नसेल तर ते प्रेम टिकत नाही. जर रणबीर कपूर आणि आलियाचे शुभमंगल झाले तर चित्रपट निर्माणातील दोन भिन्न शैलींचाही समन्वय होईल. महेश भट्ट चार कोटींच्या छोट्या भांडवलात चित्रपट बनवतात तर कपूर घराणे भांडवलाचा विचारच करीत नाही. ‘जिस देश में गंगा बहती है’ च्या क्लायमॅक्सचे उदगमंडलममध्ये चित्रीकरण सुरू होते. या वेळी कलावंतांसह सीमा सुरक्षा बलाची तुकडीही होती. एका दृश्यात एकीकडे ढग दाटून आल्याने डाकूंच्या परिसरात अंधार होतो, तर दुसरीकडे सैनिक उन्हात तापताहेत, असे दर्शवले होते. हा प्रतीकात्मक भाव दर्शवण्यासाठी राज कपूरना १० दिवस वाट पाहावी लागली होती. रणबीर कपूर आणि आलियाच्या संबंधांमुळे नक्कीच या दोन शैलींचा मिलाफ होईल. रणबीर कपूर अयान मुखर्जीसोबत तिसरा चित्रपट करतोय. हादेखील दोन शैलींचा संयोग आहे. अयान यांचे पणजोबा शशधर मुखर्जी हे मनोरंजनपर चित्रपटांचे गुरू मानले जातात, तर कपूर घराणे सामाजिक जाणिवांच्या चित्रपटांचे जनक. मुळात, मनोरंजन उद्योगात कोणत्याच मजबूत खाचा किंवा खिळे नाहीत आणि बॉक्स ऑफिससाठी सर्व प्रकारचे करार आणि समन्वय आपोआप होतात. सध्याला अयान व रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र’ शेवटच्या टप्प्यात आहे. चित्रपट आणि प्रेक्षकांची संख्या कमी होत असतानाच रणबीर कपूर, रणवीर सिंह, आलिया भट्ट आणि दीपिका यांच्या चौकोनाने प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहात आणणे शक्य आहे. हॉलीवूडच्या स्पर्धेतही मल्टिस्टारर चित्रपट बनतात. टॉम क्रुझ आणि अँथोनी पर्किन्स यांनीही एकत्र काम केलेच आहे. सलीम-जावेद जोडीने यशस्वी कथा लिहिल्या आहेत. ते सध्या विभक्त आहेत. ही जोडी पुन्हा एकत्र येत कथा लिहील? ज्यात सलमान व फरहान अख्तर एकत्र दिसतील? हे अशक्यच, पण व्यवसाय टिकवण्यासाठी हे होऊ शकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.