Wimbledon / विम्बल्डन : सर्वात प्रदीर्घ फायनल योकोविक पाचव्यांदा चॅम्पियन, ४ तास ५५ मिनिटांत फेडरर पराभूत

केट मिडलटनच्या हस्ते चषक स्वीकारताना योकोविक. केट मिडलटनच्या हस्ते चषक स्वीकारताना योकोविक.

योकोविकला २० कोटी रुपये आणि फेडररला १० कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले 
 

वृत्तसंस्था

Jul 15,2019 11:05:00 AM IST


लंडन - लॉर्ड््सपासून १६ िकमीवर ऑल इंग्लंड क्लबमध्ये रविवारी ४ तास ५५ मिनिटांची सर्वांत प्रदीर्घ विम्बल्डन फायनल झाली. यापूर्वी २००८ मध्ये नदाल व फेडररचा सामना ४ तास ४८ मिनिटे चालला होता. रविवारी अग्रमानांकित नोवाक योकोविकने पाचव्यांदा विम्बल्डन किताब जिंकला. त्याने द्वितीय मानांकित रॉजर फेडररला ७-६, १-६, ७-६, ४-६, १३-१२ ने हरवले. सर्बियाच्या याेकोविकचे हे १६ वे ग्रँडस्लॅम व कारकीर्दीतील ७५ वा किताब आहे. योकोविकला २० कोटी रुपये आणि फेडररला १० कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले.


जगातील नबंर वन नाेवाक याेकाेविक रविवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेत किताबाचा मानकरी ठरला. त्याने पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये २० वेळच्या ग्रॅण्डस्लॅम किताब विजेत्या राॅजर फेडररचा पराभव केला.सर्बियाच्या याेकाेविकने ७-६, १-६, ७-६, ४-६, १३-१२ अशा फरकाने सामना जिंकला. यासह त्याने करिअरमध्ये १६ व्य ग्रॅण्डस्लॅम किताबाची नाेंद आपल्या नावे केली. तसेच त्याच्या करिअरमध्ये विम्बल्डनचे हे पाचवे विजेतेपद ठरले. यासाठी नाेवाक याेकाेविकला फायनलमध्ये श‌र्थीची झुंज द्यावी लागली. त्याने दमदार सुरुवात करून पहिला सेट जिंकला. मात्र, त्यानंतर राॅजर फेडररने दुसरा सेट जिंकून लढतीत बराेबरी साधली हाेती. त्यानंतर याेकाेविकने तिसरा सेट जिंकला आणि सामन्यात पुन्हा आघाडी घेतली. मात्र, त्यानंतर स्वीसकिंग राॅजर फेडररने चाैथ्या सेटमध्ये ६-४ ने बाजी मारली. यासह त्याला लढतीत बराेबरी साधता आली. त्यानंतर याेकाेविकने पाचव्या सेटमध्ये १३-१२ ने बाजी मारली आणि अंतिम सामना आपल्या नावे केला.यासह त्याला यंदाच्या सत्रात दुसऱ्या ग्रॅण्डस्लॅम किताबावर नाव काेरता आले.


X
केट मिडलटनच्या हस्ते चषक स्वीकारताना योकोविक.केट मिडलटनच्या हस्ते चषक स्वीकारताना योकोविक.
COMMENT