आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Windies Beat India After 27 Months, Seven Games; Equally Successful In The Series

विंडीजची 27 महिने, सात सामन्यानंतर भारतावर मात; मालिकेत साधली बराेबरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवम दुबेच्या 54 धावा, बुधवारी तिसरा सामना मुंबईत
  • विंडीज संघ 8 गड्यांनी विजयी; सिमन्सचे तीन वर्षानंतर अर्धशतक

​​​​​​तिरुवनंतपुरम : सलामीवीर सिमन्सच्या (६७) नाबाद अर्धशतकाच्या बळावर विंडीज संघाने टी-२० मधील भारतीय संघाविरुद्धची आपली पराभवाची मालिका खंडीत केली. विंडीजने २७ महिने व सात सामन्यानंतर रविवारी यजमान भारतावर आठ गड्यांनी मात केली. यासह विंडीज संघाला तीन टी- २० सामन्याच्या मालिकेत १-१ ने बराेबरी साधता आली. आता मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बुधवारी मुंबईत हाेणार आहे.

भारतीय संघाने रविवारी प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १७० धावा काढल्या हाेत्या.प्रत्युत्तरात विंडीज संघाने दाेन गड्यांच्या माेबदल्यात १८.३ षटकांत विजयश्री खेचून आणली. संघाच्या विजयात लेव्हिस (४०), हेटमेयर (२३) आणि निकाेलसने (नाबाद ३८) माेलाचे याेगदान दिलेे. त्यामुळे टीमला मालिका पराभव टाळता आला.

शिवम दुबे चमकला

युवा फलंदाज शिवम दुबेने (५४) आपल्या घरच्या मैदानावर विंडीजविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात शानदार अर्धशतक ठाेकले. त्याचे टी-२०च्या करिअरमधील हे पहिलेच अर्धशतक ठरले. त्याने तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करताना हा पराक्रम गाजवला. यासह त्याने या स्थानावर शानदार खेळी करताना यशस्वी फलंदाज म्हणून स्वत:ला सिद्ध केले. तसेच, याच खेळीच्या बळावर भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी संघात काेणत्याही प्रकारचा बदल केला नाही.

तीन वर्षांत पहिल्यांदा फलंदाजी करताना काेहलीचे एक अर्धशतक

१ जानेवारी २०१७ पासून आजपर्यंत भारतीय संघाचा कर्णधार विराट काेहली हा प्रथम फलंदाजी करताना अपयशी ठरला. त्याला या तीन वर्षांत यादरम्यान फक्त एकच अर्धशतक साजरे करता आले आहे. त्याने १७ डावात २४ च्या सरासरीने ३६५ धावा काढल्या आहेत. यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. काेहलीने १९ धावांची खेळी केली. यासह त्याने टी-२० मध्ये २५६३ धावा पूर्ण केल्या. या फाॅरमॅटमध्ये आता सर्वाधिक धावा काढणारा काेहली हा जगातील एकमेव फलंदाज ठरला. मात्र, आता त्याचा माेठ्या खेळीचा प्रयत्न अपुरा ठरला.

काेहलीची १ धावेने राेहितवर आघाडी

विराट काेहलीच्या आता टी-२० मध्ये सर्वाधिक २५६३ धावा झाल्या आहेत. त्याने अवघ्या एका धावेच्या आघाडीने राेहितला मागे टाकले. राेहितच्या नावे २५६२ धावांची नाेंद आहे.