आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Windows 10 Mobiles Comes To An End, Company Asks Customers To Switch To Android Or IPhone

कधी-काळी Android आणि iPhone ला दिली होती टक्कर, आता बंद होत आहे ही Operating System...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दिग्गज आयटी कंपनी Microsoft ने Windows 10 mobile platform बंद करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने अधिकृतपणे स्पष्ट केले की, जे लोक आता Windows Phone चालवत आहेत, त्यांनी लवकरच iPhone किंवा Android फोनचा वापर करणे सुरू करावे. कंपनी आता Windows 10 चा सपोर्ट बंद करणार आहे.

 
आपल्या सपोर्ट पेजमध्ये कंपनीने केला खुलासा
आपल्या "End of Support" पेजमध्ये कंपनीने लिहीले, ‘Windows 10 Mobile OS मध्ये एंड ऑफ सपोर्टसोबत आम्ही कस्टमर्सना सांगू इच्छितो की, त्यांनी आता अँड्रॉइड आणि आयओएस फोन्स वापरणे सुरू करावे. 
 

या दिवशी बंद होईल विंडोज
माइक्रोसॉफ्टकडून सांगण्यात आले की, 10 डिसेंबर 2019 पासून कंपनी सिक्योरिटी अपडेट, नॉन सिक्योरिटी हॉटफिक्सिस, फ्री असिस्टेड सपोर्ट ऑप्शन किंवा टेक्नीकल कंटेंट अपडेट पाठवणे बंद करणार आहे. या तारखेपर्यंक फक्त काही Windows Phones ना अपडेट पाठवले जातील. 


अँड्रॉइड बनले कारण
2010 मध्ये कंपनीने जेव्हा आपली ऑपरेटिंग सिस्टीम रिफ्रेश केली आणि Windows Phone 7 लॉन्च केला होता, तेव्हा त्यांची खुप मोठे प्लॅन्स होते. तेव्हा कंपनीने एक परेडचे आयोजन करून BlackBerry आणि iPhone ला रेसमधून बाहेर काढण्याची घोषणा केली होती. माइक्रोसॉफ्टने तेव्हा Nokia कंपनीला विकत घेतले आणि त्यांनाही Windows फोन बनवले, पण कंपनीचा हा प्रयत्न फेल गेला. त्यानंतर Android आणि iPhone ऑपरेटिंग सिस्टीम्सने  Windows ला मोठी टक्कर दिली. Windows जवळ तितके अॅप्स नव्हते जितके अँड्रॉयड आणि अॅप्पलकडे होते. Windows स्वत:ला या रेसमध्ये ठेवण्यासाठी महत्तावची पाऊले नाही उचलु शकली आणि रेसमधून बाहेर पडली.

बातम्या आणखी आहेत...