Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | windy rain in mumbai and other cities in state

मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी वादळी पाऊस, औरंगाबाद जिल्ह्यात वीज पडून महिला ठार

प्रतिनीधी, | Update - Jun 11, 2019, 03:58 AM IST

मान्सून पुढे सरकला, मुंबईत जोरदार पाऊस, राज्यात जोरदार पावसाची शक्यता

  • windy rain in mumbai and other cities in state
    औरंगाबाद येथे सोमवारी झालेल्या वादळी पावसात एमजीएम परिसरात रस्त्यावर झाड कोसळले.

    औरंगाबाद - राज्यात सोमवारी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. औरंगाबाद, जालना, नाशिक, नगर या जिल्ह्यांत पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. औरंगाबाद तालुक्यातील खामखेडा येथे शेतात वीज पडून गंगूबाई चतुर भगुरे (६५) ही वृद्ध महिला ठार झाली, तर रेणुका ज्ञानेश्वर बंगारे (२४) ही महिला जखमी झाली. जालना जिल्ह्यात घनसावंगी, अंबड तालुक्यातील शहागड येथे तुरळक पाऊस झाला. बदनापूर तालुक्यातील काही गावांच्या शेतात पाणी साचले होते. जालना शहरात १५ मिनिटे झालेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते. पावसाने नगर शहर व परिसरालाही झोडपले. नगरच्या बंगाल चौकी भागात रिक्षावर पथदिव्याचा खांब कोसळून महिलेसह अन्य एक जण जखमी झाला.

    मान्सून पुढे सरकला, मुंबईत जोरदार पाऊस, राज्यात जोरदार पावसाची शक्यता
    केरळात ८ जूनला दाखल झालेला नैऋत्य मान्सूनने सोमवारी आगेकूच केली. आता केरळचा बहुतांश भाग, तामिळनाडूचा काही भाग तसेच बंगालच्या उपसागराचा आणखी भागासह मान्सून आता मिझोरां आणि मणिपूरच्या काही भागापर्यंत पोहोचला आहे. दरम्यान मध्य-पूर्व अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र येत्या २४ तासांत चक्रीवादळात रुपांतरीत होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे सोमवारी मुंबईत जोरदार पाऊस झाला. कर्नाटक तसेच कोकण किनारपट्टी, दक्षिण महाराष्ट्रासह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात १३ जूनपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे.

Trending