आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेस्टाॅरंटच्या नावाखाली मद्य विक्री, पोलिस यंत्रणा करतेय कानाडोळा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- मंगळवारी सायंकाळी अशोक चौक परिसरातील एका रेस्टाॅरंटमध्ये खुलेआम मद्य विक्री चालू असल्याचे पहायला मिळाले. हा प्रकार दिव्य मराठीच्या कॅमेऱ्याने टिपला. पोलिस यंत्रणेकडे याविषयी विचारणा केली असता त्यांना याचा थांगपत्ता नाही, अशा स्वरूपाचे उत्तर मिळाले. शहरात अनेक हाॅटेल, रेस्टाॅरंट आणि चायनीज गाड्यांवरून सायंकाळच्या वेळी मद्यविक्री सुरू असते, ही वस्तुस्थिती आहे. परंतु, पोलिस यंत्रणेचे याकडे कानाडोळा सुरू असल्याचे दिसून येत आहे. 


हॉटेलच्या नावाखाली बार स्वरूपाचे हॉटेल शहरात अनेक ठिकाणी नव्याने सुरू झाले आहेत. वाइन शॉपमध्ये दारू घ्यायची आणि हॉटेलमध्ये जाऊन मद्यपान करायचे, असा नवा प्रकारही दिसून येत आहे. काही ठिकाणी विनापरवाना मद्य विक्रीही होत आहे. किराणा दुकान, पानटपरी, तसेच काही वस्तीतील घरांमध्येही देशी-विदेशी दारूची विक्री खुलेआम होत असल्याचे दिसते. 


रेल्वे स्टेशन, भय्या चौक, नवी पेठ, अशोक चौक, कुमठा नाका, पुना नाका, बाळे, कन्ना चौक, बोरामणी नाका, हैदराबाद रोड या ठिकाणांवर विनापरवाना दारू विक्री होत आहे. हॉटेलमध्ये बसून पिण्यासाठी सोयही केली जाते. अशा हॉटेलमध्ये जेवण किंवा स्नॅक्ससाठी एखादी ऑर्डर करण्यात येते आणि मग त्यांना मद्यपान करण्यासाठी जागा मिळते. अशा हॉटेलवर पोलिसांची कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. हा प्रकार शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. काही वाइन शॉपच्या बाहेर पदपथावर काही लोक मद्यपान करत असतात. त्यांच्यावरही कारवाई केली जात नाही. 


आशोक चौक पोलिस चौकीच्या समोर रात्री उशिरापर्यंत अंडा आॅम्लेटच्या गाडीवर दारू पिणे सुरू असते. नवी पेठ भागात रात्रीच्या वेळी दुकाने बंद झाल्यावर सोड्याच्या गाडीवर व वन-वेतील अंडा ऑम्लेटच्या गाडीवर मोठ्या प्रमाणात मद्य पिण्याचा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू असतो. गस्त घालणारे बीट मार्शल फिरत असतात तरीही त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई मात्र होत नाही. 


अशोक चौक, साखर पेठ, संत तुकाराम चौक या भागांमध्ये अवैध दारू विक्री व हॉटेलमध्ये दारू पिण्याचा गैरप्रकार चालू आहे, याची कल्पना नाही. अशा अवैध दारू विक्री व हॉटेलमध्ये दारू पिणाऱ्या लोकांना पोलिस स्टेशनकडून कोणतीही परवानगी दिली जात नाही. असा प्रकार जर काय असेल तर हॉटेल्सवर कडक कारवाई केली जाईल. राम अभंगराव, पोलिस निरीक्षक जेल रोड 

बातम्या आणखी आहेत...