आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्राला विद्यापिठाचा कुलगुरू बनवण्यासाठी अमित शाहंच्या नावाने राज्यपालांना केला कॉल, एसटीएफकडून दोघे अटक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मित्राला वैद्यकिय विद्यापिठाचा कुलगुरू बनवण्यासाठी विंग कमांडरचा राज्यपाल लालजी टंडन यांना फोन

भोपाळ(मध्यप्रदेश)- मित्राला वैद्यकीय विद्यापिठाच्या कुलगुरुपदी बसवण्यसाठी एअरफोर्समधील एका विंग कमांडरने अवैधरित्या गृहमंत्री अमित शाहंच्या नावाने राज्यपालांना शिफारशीसाठी फोन केला. विंग कमांडर कुलदीप वाघेलाला आपला मित्र डॉ चंद्रेश कुमार शुक्लाला विद्यापिठाचा कुलगुरू बनवायचे होते. यासाठी वाघेलाने राज्यपाल लालजी टंडन यांना गृहमंत्री अमित शाहंच्या नावाने फोन केला. राज्यपालांना संशय आल्याने त्यांनी तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरुन एसटीएफने कारवाई करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.


विंग कमांडर कुलदीप वाघेला, जे एअर फोर्स हेड क्वार्टर दिल्लीमध्ये पदस्त आहेत, त्यांनी गृहमंत्री अमित शाहंच्या नावने फोन करुन राज्यपाल लालजी टंडन यांना डॉ. चंद्रेश कुमार शुक्लाला वैद्यकीय विद्यापिठाचे कुलगुरू बनवण्याची शिफारस केली. राज्यपालांना संशय आल्याने राजभवाच्या सांगण्यावरुन एसटीएफमध्ये तक्रार करण्यात आली. त्यानंतर दिल्लीमध्ये गृह मंत्री शाहंच्या बंगल्यावर याप्रकारे कॉल न केल्याचे स्पष्ट झाले.

एडीजी अशोक अवस्थींनी सांगितले की, जबलपूरच्या मध्यप्रदेश वैद्यकीय विद्यापिठाच्या कुलगुरूंची निवड होणार होती, यासाठी अनेकजणांनी बायोडाटा दिला होता. कुलगुरू निवडीसाठी सर्च कमेटीने साक्षात्कार घेतले होते. याच पदासाठी अमित शाहंच्या नावाने विंग कमांडर कुलदीप वाघेलाने आपला मित्र चंद्रेश कुमार शुक्लाच्या शिफारशीसाठी फोन केला. तपासानंतर दोघांनाही ताब्यात घेण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...