आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पंख है घायल, आंख है धुंधली, जाना है सागर पार’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वातावरणात बदल होताच पक्षी आक्रोश करतात, असे अल्फ्रेड हिचकॉक यांच्या ‘बर्ड््स’ या चित्रपटात दाखवले आहे. अन्य एका चित्रपटात मानवी समूहाचे नुकसान करून काही लोक हेलिकॉप्टरमधून परत जात असतात. त्या हेलिकॉप्टरवर आक्रमण करावे, असे आवाहन त्या समूहातील एक जण पक्ष्यांना करतो. पक्ष्यांचे थवे हेलिकॉप्टरच्या काचेवर धडकतात, परिणामी पायलटला काही दिसत नाही आणि अपघात होतो. काही जण पक्ष्यांची भाषा समजतात, पक्षीही माणसांची भाषा समजतात.  पक्ष्यांच्या जगात प्रेम, सद्भावना आहे. कावळ्याने तयार केलेल्या खोप्यात काेकिळा अंडी घालते आणि कावळा या पिलांना अन्न-पाणी आणून देतो. पक्ष्यांच्या घरावर कोणताही मालकी अधिकार नसतो. त्यांची घरे कम्युनिस्टांच्या कम्यूनसारखी असतात. त्यांच्या निवासाची कोणतीही नोंद नसते. पृथ्वीचे तापमान वाढत आहे. प्रदूषणामुळे माणसांप्रमाणेच पक्ष्यांचेही जीवन धोक्यात आले आहे. राज कपूर आणि नर्गिस यांच्या चोरी-चोरी चित्रपटात ‘पंछी बनूं उड़ती फिरू मस्त गगन में । आज मैं आज़ाद हूं दुनिया के चमन में’ हे गीत आहे.  ऋषिकेश मुखर्जी यांच्या ‘गुड्डी’ चित्रपटात ‘बोले रे पपीहरा...’, ‘अनाड़ी’ चित्रपटात ‘बन के पंछी गाएं प्यार का तराना’ ही गाणी आहेत. ‘सीमा’ चित्रपटासाठी शैलेंद्र यांनी ‘पागल मन का घायल पंछी उड़ने को बेकरार, पंख हैं कोमल, आंख है धुंधली जाना है सागर पार, अब तू ही हमें बता, जाएं कौन दिशा में हम..’ हे गीत लिहिले. इंग्रजांनी लादलेल्या गुलामगिरीमुळे देशाचे पंख घायाळ झाले आहेत, पण विकासाची इच्छा प्रबळ आहे, असे शैलेंद्र यांना म्हणायचे आहे. सर्वात महत्त्वाचे हे आहे की, देशाने कोणत्या दिशेने जावे? समता, न्याय आधारित धर्मनिरपेक्षता की फॅसिझमच्या दिशेने?  शैलेंद्र यांच्या प्रेमगीतांतही सामाजिक आशय असायचा. राज कपूर त्या गीतांना ‘तोतापुरी गीत’ म्हणायचे, कारण माणसाकडून ऐकलेल्या गोष्टींचे पोपट अनुकरण करतो.  जयपूर येथील परवेज अहमद गेल्या चार दशकांपासून जखमी पशू-पक्ष्यांची सेवा करत आहेत. त्यांना अन्नपाणी पुरवण्यासाठी आपल्या मर्यादित उत्पन्नाचा मोठा भाग खर्च करतात. जयपूर येथील आपल्या एक हजार चौरस फुटांवरील घरात ते पक्ष्यांसह जनावरांनाही आश्रय देतात.  पक्षी आणि पशूंवर डॉ. टी. रामचंदानी, डॉ. उमाशंकर आणि डॉ. सुनील वर्मा मोफत उपचार करतात. स्वार्थाने भरलेल्या जगात आजही असंख्य लोक समाजसेवा करत आहेत. अशा लोकांमुळेच घोर निराशा दूर होते. साहिर लुधियानवी म्हणतात, ‘वह सुबह कभी तो आएगी, वह सुबह हमी से आएगी’। उडणाऱ्या विमानाच्या वैमानिक कक्षाच्या काचेला पक्षी धडकला तर दुर्घटनेची शक्यता असते. विमानतळापासून पक्षी दूर राहावेत यासाठी तेथे अन्न-पाणी देण्यावर बंदी आहे. मनमोहन देसाई यांच्या एका चित्रपटात गरुड नायकाच्या खांद्यावर बसलेला असतो. या पक्ष्यांचे आयुर्मान कमी असते. त्यामुळे अनेक दिवस चाललेल्या या चित्रीकरणात तीन पक्ष्यांचा वापर करण्यात आला. त्यासाठी झालेल्या खर्चाच्या रकमेवर प्राप्तिकर विभागाने शंका उपस्थित केली होती. चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर खर्चाचा तपशील प्राप्तिकर विभागाला देण्याचा नियम होता. प्राप्तिकर विभाग सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यानुसार बडगा उगारत असतो.

बातम्या आणखी आहेत...