आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सारंग, ग्लोबल स्टार्सने दाखवले कसब

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जगभरातून आलेले सुमारे १ हजाराच्या वर प्रतिनिधींनी प्रदर्शनात घेतला भाग
  • यात एअरबस, बोइंगसह या क्षेत्रातील प्रमुख कंपन्या सहभागी होतात

नागरी हवाई मंत्रालयाच्या वतीने भारतीय विमान प्राधिकरण आणि भारतीय वाणिज्य व उद्योग परिसंघाच्या सहकार्याने तेलंगणातील हैदराबादमध्ये “विंग्ज इंडिया २०२०” या प्रदर्शनाला गुरुवारी सुरुवात झाली. हे प्रदर्शन दर दोन वर्षांनी आयोजित करण्यात येते. यात एअरबस, बोइंगसह या क्षेत्रातील प्रमुख कंपन्या सहभागी होतात. या प्रदर्शनामुळे नागरी हवाई क्षेत्राला आणखी मजबूत करण्यासाठी आराखडा तयार करण्यात मदत होते. > या प्रदर्शनात विस्मयकारी कसरती करण्यात येणार आहेत. भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर सारंग आणि इंग्लंडच्या वैमानिकांच्या विंग एअरक्राफ्ट ग्लोबल स्टार्सने आपले कसब दाखवले. या प्रदर्शनात जगभरातून आलेले सुमारे १ हजाराच्या वर प्रतिनिधींनी भाग घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...