आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळ्यातही या घरगुती उपायांनी टिकवून ठेवा त्वचेचा मुलायमपणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिवाळ्यात शुष्क हवेमुळे त्वचेवरील नैसर्गिक तेल शोषले जाते. यामुळे त्वचेचा मुलायमपणा नाहीसा होतो. तेलकट त्वचा असलेल्यांचा असा समज आहे की, हिवाळ्यात पुटकुळ्यांच्या समस्येपासून थोडा दिलासा मिळेल. परंतु हा समज खरा नाही, एक तर शुष्क हवेमुळे तेल ग्रंथी (सीबेशियस ग्लँड्स) अतिरिक्त तेलाचे प्रमाण वाढवते. ज्याचे परिणाम पुटकुळ्यांच्या रूपात दिसून येते. तसेच त्वचा फुटायला लागते. त्यावर पेट्रोलियम जेली किंवा मॉइश्चरायझर लावण्याने पुन्हा पुटकुळ्या वाढतात. वरील लोशन लावले नाही तर त्वचेला खाज सुटून ती जळजळ करते. यासाठी हिवाळ्यात पुढील प्रमाणे विशेष लक्ष दिले पाहिजे, ज्यायोगे त्वचेचा ताजेपणा टिकून राहील. 


 - हिवाळ्यातही पाणी वेळोवेळी प्यावे, ज्यामुळे शरीरातील विषाक्त पदार्थ त्वचेवाटे बाहेर निघतील.


- दिवसातून दोन वेळा चेहरा पाण्याने धुवा, नंतर वॉटर बेस्ड् मॉइश्चरायझर लावा. पेट्रोलियम जेली सारख्या वस्तू थेट चेहरा किंवा ओठांवर लावू नका. 


- जर बाजारातील वस्तू वापरण्याची इच्छा नसेल तर घरगुती स्क्रब, मास्क, मॉइश्चरायझर बनवून त्वचेची देखभाल करू शकता. 


- आठवड्यातून एक किंवा दोन वेळा साखरेच्या दाण्यात लिंबूचा रस किंवा गुलाबजलाचे काही थेंब टाकून हलक्या हाताने चेहऱ्यावर ते पेस्ट रगडा. सर्वात सोपा हा स्क्रब आहे. ज्यायोगे मृत त्वचा निघते. तसेच ओटस आणि मध २० मिनिट लावून पाण्याने ते स्वच्छ करू घ्या. 


- मास्क : अंड्याला पांढरा थर येईपर्यंत घुसळत राहा. नंतर त्यात काही थेंब लिंबूचा रस आणि केळी टाकून ते लावा. अंड्यातील घटकांमुळे लाइसोझाइम्स सारखे डाग हलके होऊ शकतात. तसेच त्वचेला चमक आणते. 


मॉयश्चरायझर : जैतूनच्या तेलात दूध आणि निंबूचे काही थेंब टाकून मिसळा. ब्रेकिंग सोड्यात निंबूचे काही थेंब टाकून ते त्वचेवर लावणे सोपे बनते. गुलाबाच्या पाकळ्या गुलाबजलसोबत वाटून जैतूनच्या तेलात मिसळून ते त्वचेवर लावता येते. 


आयुर्वेद फिजिशियन, भोपाळ 
डॉ.नाझिया नईम 

बातम्या आणखी आहेत...