आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळ्यात त्वचा मऊ आणि कोमल ठेवण्यासाठी कोमट पाण्याचा असा वापर करा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिवाळ्यात थंड वाऱ्यामुळे त्वचा रखरखीत आणि निस्तेज होते. या ऋतूत लक्ष दिले नाही तर एग्जिमा किंवा सोरायसिससारखे गंभीर आजार होऊ शकतात. जाणून घेऊया काही सोप्या उपायांना ज्यामुळे तुमची त्वचा मऊ होऊ शकते. 


1.कोमट पाण्याने अंघोळ करा 
जास्त गरम पाण्याने त्वचेतील तेल नाहीसे होते. यामुळे त्वचा रखरखीत आणि निस्तेज होते. यापासून बचावासाठी गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याने अंघोळ करावी. 


2. मॉयश्चराइजर लावा 
अंघोळीनंतर जेव्हा त्वचा ओली असते तेव्हा त्यावर मॉइश्चराइजर लावण्यास विसरु नका. यामुळे त्वचेमध्ये मऊपणा टिकून राहतो. रखरखीत त्वचेवर हे लावणे जास्त फायदेशीर आहे. 


3. सनस्क्रीन आहे फायदेशीर 
साधारणत: या ऋतूत लोक सनस्क्रीन लावत नाहीत, परंतु सूर्यप्रकाशातून येणारी अल्ट्रावॉयलेट किरणे हिवाळ्यात सर्वांत जास्त असतात. म्हणून सनस्क्रीन लावावे. 


4. सुती कपडे घाला 
सरळ गरम कपडे घातल्यामुळे त्वचेमध्ये जळजळ, रॅशेज किंवा अलर्जी होऊ शकते. म्हणून गरम कपड्यांच्या आत सुती कपडे जसे टी शर्ट अवश्य वापरावे. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन टिप्स...

बातम्या आणखी आहेत...