आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूध, अन्नात भेसळ केल्यास आजन्म कैद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -दूध  किंवा इतर खाद्यपदार्थ व औषधांत भेसळ करणाऱ्यांना यापुढे आजन्म कारावासाची शिक्षा भोगावी लागेल. याबाबतचे सुधारणा विधेयक मंगळवारी विधानसभेत आवाजी बहुमताने मंजूर झाले. सन १८६० च्या भारतीय दंड संहितेच्या अधिनियम ४५ मधील कलम २७२ ते २७६ अन्वये खाद्यपदार्थ, पेय, औषधे आणि औषधासाठीच्या पदार्थांत भेसळीसाठी ६ महिने कैद व १ हजारापर्यंतच्या दंडाची तरतूद होती.

 

औषधीद्रव्य व सौंदर्य प्रसाधने अधिनियम १९४० यात याच गुन्ह्यासाठी १० वर्षे ते आजन्म कारावासाची तरतूद आहे. परंतु कोर्टास अपवादात्मक परिस्थितीत कारणे नमूद करून आजीवन कारावासाची शिक्षा कमी करून त्यापेक्षाही कमी कालावधीच्या शिक्षेचीही तरतूद यात करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...