आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन; मंदी, काश्मीर, शेतकऱ्यांचा मुद्दा गाजणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून यासाठी आयोजित सर्वपक्षीय बैठकीला रविवारी २७ पक्ष उपस्थित राहिले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सांसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी होते. दरम्यान, लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले, की या अधिवेशनात आर्थिक मंदी, काश्मीर, रोजगार आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा व्हायला हवी. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, सरकार प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करेल. गेल्या अधिवेशनासारखेच हे अधिवेशनही यशस्वी ठरावे, अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली. 
 

नागरिकत्वाचे विधेयक...

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक व ई-सिगारेटवर बंदी ही विधेयके सरकारच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. पाक, अफगाणिस्तान, बांगला देशातील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी व ख्रिश्चन निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्याचा यात प्रस्ताव आहे.