Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | wipro made every villager millionaire in amalner of jalgao

विप्रोचा पहिला कारखाना असलेल्या गावात 4,750 कोटी रुपयांचे शेअर्स; असे आहे जळगावातील कोट्यधीशांचे गाव

चंद्रकांत पाटील | Update - Mar 17, 2019, 02:18 PM IST

अझीम प्रेमजींच्या वडिलांनी याच गावातून केली विप्रो समूहाची सुरुवात

 • wipro made every villager millionaire in amalner of jalgao

  अमळनेर - तसे पाहता महाराष्ट्रातील अमळनेर शहराला फारसे कुणी अाेळखत नाही; परंतु जळगाव जिल्ह्यातील हे शहर काेट्यधीशांचे गाव अाहे. २.८८ लाख लाेकसंख्या असलेल्या या शहरात विप्राे कंपनीचे सुमारे ३ % शेअर्स अाहेत व सध्याच्या बाजारपेठेनुसार या शेअर्सचे मूल्य सुमारे ४,७५० काेटी रुपये अाहे. विशेष म्हणजे, यातील बहुतांश शेअर्स अतिशय कमी किमतीत देण्यात अाले. तसेच हजाराे शेअर्स तर भेटवस्तू म्हणून दिले गेले हाेते. विप्राे अायटी कंपनी नव्हती व केवळ तेल, वनस्पती तूप व इतर उत्पादने बनवत हाेती तेव्हाची ही गाेष्ट अाहे. अलीकडेच पुन्हा एकदा ५२ हजार काेटी रुपयांचे शेअर्स दान देणारे विप्राेचे चेअरमन अझीम प्रेमजी यांच्या वडिलांनी विप्राे समूहाची सुरुवात याच शहरात कंपनी टाकून केली हाेती.


  अझीम प्रेमजींचे उद्याेगपती वडील हाशम प्रेमजी यांनी १९४७ मध्ये 'वेस्टर्न इंडिया व्हेजिटेबल प्राॅडक्ट्स लिमिटेड'ची- विप्राेची स्थापना केली हाेती. या भागात माेठ्या प्रमाणावर भुईमूग शेंगांचे उत्पादन हाेत असल्याने त्यांनी शेंगदाणा तेल, वनस्पती तूप बनवण्याचा येथे कारखाना सुरू केला हाेता. या उद्याेगाची सूत्रे हाती अाल्यानंतर १९८५ मध्ये अझीम प्रेमजी यांनी अायटी कंपनीचा पाया रचला व येथूनच विप्राेचे नाव जागतिक स्तरावर पाेहाेचण्यास प्रारंभ झाला. अझीम प्रेमजी यांनी १२ फेब्रुवारी २०१३ राेजी अमळनेरला शेवटची भेट दिली हाेती. तसेच कंपनीतील कर्मचाऱ्यांना स्वहस्ताने इंडक्शन कुकरचे वितरणही केले हाेते. याबाबत माहिती देताना अमळनेरचे रहिवासी सुनील माहेश्वरी यांनी सांगितले की, त्या काळात शेठजींनी १०० रुपये मूल्य असलेले कंपनीचे शेअर्स कर्मचारी व व्यापाऱ्यांना दिले हाेते. अशा प्रकारे सुमारे ५५ ते ६० हजार शेअर्सचे वितरण करण्यात अाले हाेते. त्यामुळे त्या काळातील बहुतांश कर्मचाऱ्यांच्या पुढील पिढ्या अाता काेट्यधीश बनल्या अाहेत. यापैकी अनेक समभागधारकांनी मात्र अाता शहर साेडले अाहे.


  १९७० च्या दशकात कर्मचाऱ्यांनी शे-दाेनशे रुपये देऊन खरेदी केलेल्या शेअर्सचे मूल्य अाता पाच काेटी रुपयांपेक्षा जास्त झाले अाहे. अनेक जणांनी तर विप्राेकडून मिळणाऱ्या लाभांशातूनच स्वत:चे लहान-माेठे व्यवसाय उभारले. याचपैकी एक असलेल्या अरविंद मुठ्ठे यांना अापले वडील अापल्यासाठी काेट्यवधींचे शेअर्स मागे साेडून गेल्याचे माहीतही नव्हते. त्यांच्या मित्रांनी विप्राेच्या वार्षिक अहवालातील समभागधारकांच्या नावांच्या यादीत मुठ्ठे यांचे नाव दिसल्यावर त्यांना याबाबत सांगितले. त्या शेअर्सच्या विक्रीतून त्यांनी केवळ स्वत:चे कर्जच फेडले नाही, तर ते श्रीमंतही बनले. तसेच डागा कुटुंबात दाेन भाऊ व तीन बहिणी असून, त्यांचे वडील विप्राेच्या कंझ्युमर प्राॅडक्ट्स (बल्ब, साबण अादी) अादीचे एजंट हाेते. त्यांच्याकडे पाच लाख मूल्याचे शेअर्स हाेते. त्यांचे हल्लीचे मूल्य ४० काेटींच्या जवळपास अाहे. याशिवाय इतर समभागधारकांत शेतकरी, किराणा दुकानदार, कंपनीचे स्थानिक कर्मचारी व सेवानिवृत्तांचा समावेश अाहे, ज्यांचे राहणीमान अगदी साधे अाहे; परंतु त्यांच्यापैकी प्रत्येक जण काेट्यधीश अाहे, हे त्यांच्याकडे पाहून वाटतही नाही.


  १०० रुपयांच्या शेअरची किंमत अाता ५.५ काेटी रुपये
  १९७० मध्ये १०० रुपयांचे शेअर्स खरेदी करणे साेपी गाेष्ट नव्हती. कारण त्या काळी १०० रुपयांची व्यवस्था करणेदेखील खूप कठीण हाेते; परंतु स्प्लिट्स व बाेनस मिळून त्या प्रत्येक शेअरचे मूल्य अाज ५.५ काेटी रुपये एवढे झाले अाहे. विप्राेच्या अमळनेरच्या समभागधारकांसाठी हेच शेअर्स अाज निश्चित उत्पन्नाचे स्राेत बनले अाहेत. शेअर बाजारातील तज्ज्ञ काहीही सांगत असले तरी काेणताही शेअरधारक अापल्याकडील एक शेअरही विकू इच्छित नसल्याची स्थिती आहे.

Trending