आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरणाची चतुराई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका जंगलात मोठ्या संख्येने हरणांचा वावर होता. परंतु आपल्या सहका-यांची संख्या कमी होत चालल्याचे एका हरणाच्या लक्षात आले. त्याने आपल्या इतर सहका-यांना सावध केले; परंतु कोणी त्याकडे लक्षच दिले नाही. त्या हरणाने आपल्या मित्राला सांगितले, अशाच डेरेदार व गच्च पानांनी भरलेल्या वृक्षांच्या फांद्यावर दडून शिकारी मचाण बांधतात. यासाठी आपण या वृक्षाखाली जायलाच नको. त्याचा मित्र त्याची गोष्ट ऐकून तेथेच थांबला. तिकडे त्या पानाआड दडलेल्या शिका-याने दोघांकडे फ ळे फेकण्यास सुरुवात केली. चतुर हरणास समजले की, झाडावर शिकारी बसलेला आहे; परंतु त्याचा साथीदार ती फळे खाण्यासाठी झाडाखाली गेला. तेव्हा शिका-याने त्याची लगेच शिकार केली. चतुर हरणाने तेथून धूम ठोकून आपला जीव वाचवला.