आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • With 40 Crore And 2000 Junior Artist Will Shoot Kamal Haasan's 'Indian 2' Action Scene

40 कोटी आणि 2000 जूनियर आर्टिस्टसोबत शूट होईल कमल हसन यांच्या 'इंडियन-2' चित्रपटातील अॅक्शन सीन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : कमल हसन यांचा चित्रपट 'इंडियन 2' चे दोन शूटिंग शेड्यूल पूर्ण झाले आहे. 1996 मध्ये आलेल्या तमिळ चित्रपट 'इंडियन' चा अॅक्शन सीक्वल ग्रँड लेव्हलवर बनवला जात आहे. याचे पुढचे शेड्यूल मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये शूट केले जाईल. या अॅक्शन सीक्वेंससाठी सुमारे 40 कोटींचे बजेट ठेवले गेले आहे.  

पीटर हेन करणार आहेत अॅक्शन कोरियाग्राफ... 
'इंडियन 2' चा हा खास अॅक्शन सीक्वेंस पीटर हेन कोरियोग्राफ करणार आहेत. इंडिया टुडेच्या बातमीनुसार, हा सीन सुमारे 2000 जूनियर आर्टिस्ट आहे. या खास अॅक्शन सीनमध्ये कमल हसन 90 वर्षांच्या व्यक्तीचा रोल करणार आहेत. 

चित्रपटातील इतर कलाकार... 
चित्रपटात कमल यांच्यासोबत काजल अग्रवालदेखील दिसणार आहे. काजल या चित्रपटात अॅक्शन करताना दिसेल. यासाठी काजल इंडियन मार्शल आर्ट कलारिपयट्टूचे ट्रेनिंग घेत आहे. चित्रपटात रकुल प्रीत सिंहदेखील मुख्य भूमिकेत आहे.  

2021 मध्ये होईल चित्रपट रिलीज... 
1996 मध्ये आलेला चित्रपट 'इंडियन' मध्ये कमल हसन यांनी पिता आणि मुलाचा डबल रोल केला होता. ही एका अशा व्यक्तीची गोष्ट होती जो सिस्टीममध्ये पसरलेला भ्रष्टाचार समोर आणतो. प्रिया भवानी शंकर, सिद्धार्थ हेदेखील चित्रपटात दिसतील. हा चित्रपट 14 एप्रिल 2021 ला रिलीज होणार आहे.