योग-संयोग / डिसेंबरमध्ये 5 रविवार, सोमवार आणि मंगळवार असल्यामुळे देशाच्या राजकारणात घडू शकतात मोठे बदल

सूर्य, चंद्र आणि मंगळाच्या विशेष स्थितीमुळे देशात असंतुष्टी आणि तणाव राहील

Dec 01,2019 12:05:00 AM IST

यावर्षी डिसेंबर महिन्यात 5 रविवार, सोमवार आणि मंगळवार असल्यामुळे सूर्य, चंद्र आणि मंगळाचा विशेष प्रभाव राहील. या 3 ग्रहांच्या स्थितीमुळे देशात मोठे बदल आणि घटना घडू शकतात. डिसेंबर महिन्याची सुरुवात 1 तारीख रविवारपासून होईल. या महिन्यात 8, 15, 22, 29 तारखेला रविवार असतील. याच क्रमामध्ये 2 डिसेंबरला सोमवार असेल आणि 9, 16, 23, 30 तारखेला पुन्हा सोमवार असेल. अशाचप्रकारे 3 डिसेंबरसहित 10, 17, 24 आणि 31 तारखेला मंगळवार असेल.

  • 5 रविवार असल्याचा प्रभाव

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार, सूर्य ग्रहाला राजकारणाशी संबंधित मानले जाते. पाच रविवार एक महिन्यात आल्याचे सूचक म्हणजे राजकारणात काही विशेष घटना घडू शकतात, ज्या सामान्य जनतेच्या मनाविरुद्ध असू शकतात. सरकार आणि प्रशासनाशी संबंधित मोठे निर्णय या महिन्यात होण्याची शक्यता आहे. या महिन्यात देशातील राज्य सरकार आणि राजकीय पक्षामध्ये मोठे बदल घडू शकतात.

  • 5 सोमवारचा प्रभाव

ज्योतिषमध्ये सोमवार चंद्राचा दिवस मानला जातो. या महिन्यात 5 सोमवार असल्यामुळे धान्य आणि द्रव्य म्हणजे दूध, पाणी आणि इतर खाद्य लिक्विडचे भाव वाढू शकतात. चंद्राच्या प्रभावामुळे या महिन्यात देश आणि जगात हवामानात विचित्र बदल होण्याची शक्यता आहे. बर्फवृष्टीसोबतच देशातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. चंद्राच्या प्रभावामुळे आजार वाढू शकतात. या महिन्यात 5 सोमवार असल्यामुळे चंद्राचा प्रभाव वाढेल. गोचर स्थतीमध्ये चंद्र पीडित असल्यामुळे काही लोकांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागू शकते.

  • 5 मंगळवारचा प्रभाव

मंगळवार उग्रतेचे प्रतीक आहे. अशा ग्रहस्थितीमुळे शेजारील देशांसोबत वाद होऊ शकतात. दहशतवादी घुसखोरीसहित इतर कोणती मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. परंतु पाच सोमवारच्या प्रभावामुळे ही नकारात्मकता कमी होऊ शकते. कारण सोमवार शुभ मानला जातो आणि चंद्र मनाचा कारक ग्रह असल्यामुळे सर्व अशुभ घटना दूर होण्याची शक्यता प्रबळ बनते.

X