आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका तासातच 8-8 लाख रुपयांची कमाई करते ही सुंदर तरुणी, लोकांना लावलंय याड...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅनबेरा - पैसे कमविण्यासाठी लोक दिवसरात्र मेहनत करत असतात. चांगली जॉब आणि सॅलरी मिळाल्यानंतरही असे अनेक लोक सापडतील जे आपल्या नोकरीवर समाधानी नाहीत. त्यात स्वतःचा बिझनेस म्हणजे, 24 तासांची कटकट. परंतु, आम्ही आपल्याला एका अशा तरुणीबद्दल सांगत आहोत जी अवघ्या एका तासात इतकी कमाई करते की अनेक उद्योजकांची ती महिन्याची तर नोकरीपेशा करणाऱ्यांची वर्षभराची सुद्धा कमाई नसेल. एका तासातच ती 8 लाख रुपये कमावते. विशेष म्हणजे, ती नोकरी सुद्धा करत नाही. 


हसत खेळत कमविते लाखो रुपये....
ऑस्ट्रेलियात राहणारी चेल्सिया मिंक्स फार्मसी विषयात ग्रॅजुएट आहे. परंतु, औषधींमध्ये तिचे मन लागले नाही. नोकरी करण्यात तिला रस नव्हता. ती कुठल्याही प्रकारची नोकरी किंवा उद्योग करत नाही. तिला व्हिडिओ खेमचा छंद होता. आपल्या याच आवडीला तिने कमाईचे साधन केले आहे. ती ऑस्ट्रेलियातील सर्वात प्रसिद्ध व्हिडिओ गेमर्सपैकी एक आहे. तसेच अवघ्या एका तासात ती 8 लाख रुपयांची कमाई करते. काही महिन्यांतच ती हसत खेळत कोट्यधीश बनली आहे. 


नेमकी कशी होते कमाई?
- चेल्सिया ऑनलाईन व्हिडिओ गेम खेळते आणि आपल्या गेमिंगचे लाइव्ह स्ट्रिमिंग करत असते. तिला लाइव्ह खेळताना पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांची नेहमीच गर्दी असते. प्रत्येक व्हिडिओला हजारो लाखो दर्शक असतात. जेवढे जास्त दर्शक तेवढ्याच तिला आपल्या लाइव्ह व्हिडिओमध्ये जाहिराती मिळतात. या जाहिरातींचे दर लाइव्ह व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या गर्दीवर असते. नेहमीच लाखोंची गर्दी होत असल्याचे पाहता तिच्या व्हिडिओमध्ये जाहिराती देण्यासाठी स्पॉन्सर्सच्या रांगा लागतात. अशात ती अवघ्या तासाभरातच सरासरी 8 लाख रुपयांची कमाई करते. 
- गेमिंग जगतात चेल्सियाचे 4.7 कोटी फॉलोअर्स आहेत. जे रोज तिचा व्हिडिओ पाहण्यासाठी न चुकता ऑनलाईन येतात. या व्यतिरिक्त तिचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर मिळणाऱ्या नवीन दर्शकांची संख्या वेगळीच. हसत-खेळत आणि अगदी आपल्या आवडीचे काम करून कोट्यधींची कमाई करणारी चेल्सिया इंटरनेट यूझर्समध्ये आयकॉन झाली आहे. अनेक तरुणी तिच्यासारखे होण्याचा प्रयत्न करत आहेत. इंस्टाग्रामवर सुद्धा तिचे लाखो चाहते आहेत.


पुढील स्लाइड्सवर पाहा, चेल्सियाचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...