आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक / नवी दिल्ली : नववर्षाच्या सुरुवातीस कांद्याच्या भावाने ग्राहकांना दिलासा दिला आहे. बहुतांश राज्यांत ठाेक भाव ५० रुपये आणि किरकाेळ भाव ७० ते ८० रुपयांदरम्यान झाले. एका महिन्यापूर्वी किरकाेळ भाव १५० रुपयांपर्यंत पाेहाेचले हाेते. नाशिकच्या लासलगाव बाजारपेठेसह मध्य प्रदेश, गुजरात व राजस्थानमध्ये नव्या कांद्याची आवक हाेताच बाजारातील पुरवठा दीड ते दाेनपट वाढला आहे. आवक वाढल्यानंतर नाशिक जिल्ह्यात गेल्या आठवड्यात कांद्याचे दर दाेन ते तीन हजार रु. प्रतिक्विंटलची घसरण नाेंदली आहे. लासलगाव बाजार समितीत ४,१०० ते ४,५०० रु. प्रतिक्विंटल दराने विक्री हाेत आहे. येथे डिसेंबरमध्ये राेज सरासरी १४ हजार क्विंटल कांद्याची आवक हाेत हाेती. जानेवारीत ती २३ हजार क्विंटल हाेती. रायपूर, पाटणा, अहमदाबाद, जयपूरमध्ये आवक दुप्पट झाली. झारखंडमध्ये विक्री हाेणाऱ्या कांद्यातील ७५% कांदा नाशिकहून येताे. येथे आवक वाढल्याने ठाेक बाजारात कांद्याचा भाव निम्म्यापेक्षा कमी झाला आहे. चंदिगडमध्ये डिसेंबरच्या पहिल्या आठवड्याच्या तुलनेत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आवक दुप्पट झाली. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारांमध्ये आराेप-प्रत्याराेप वाढले आहेत. केंद्र सरकारने किमतीवरील नियंत्रणासाठी ज्या विदेशी कांद्याची आयात केली, ताे उचलण्यासाठी राज्य सरकारे तयार नाहीत. राज्य सरकारांनुसार, केंद्राकडून ज्या किमतीत कांदा खरेदी केला जाईल, त्यात स्थानिक स्तरावर कांदा उपलब्ध हाेईल. अशा स्थितीत ताेटा सहन करावा लागताे.
ठाेक बाजारपेठेत चांगल्या प्रतीच्या कांद्यास ३० रु. किलाेपर्यंत येण्याची अपेक्षा
रांचीचे बटाटा-कांद्याचे ठाेक व्यापारी संजय साहू यांनी सांगितले की, येत्या आठवड्यात चांगल्या कांद्याचा भाव ३० रु. हाेऊ शकताे. जयपूरच्या ठाेक व्यापाऱ्यानुसार, एका महिन्यातच कांद्याचे भाव २५ रु. प्रतिकिलाेपर्यंत घटू शकतात. याचे कारण म्हणजे, आगामी महिन्यात जयपूर, सीकर, कुचामन, मथानियाहून कांद्याची नवी आवक सुरू हाेणार आहे. चंदिगडच्या बाजारेठेतील व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आवक वाढल्यामुळे ५०-५५ रु. प्रतिकिलाे भावावर येऊ शकते.
पाेंगलमुळे कांद्याचे भाव स्थिर
नाशिकचे कांद्याचे ठाेक व्यापारी विकास सिंह यांच्या म्हणण्यानुसार, कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्यातीवर बंदी आणि आयात झाल्याने भाव कमी हाेत आहे. सध्या दक्षिण भारतात पाेंगलमुळे कांद्याची आवक वाढली आहे. या कारणास्तव भावांत स्थैर्य आहे. दाेन ते तीन आठवड्यांत रिटेल बाजारात कांद्याच्या दरात २० ते ३० रुपये घसरण हाेण्याची शक्यता आहे. जयपूर व अहमदाबादमध्ये ठाेकमध्ये ३० रु. प्रतिकिलाे विकला.
आणखी भाव घसरण्याची शेतकऱ्यांनी घेतली धास्ती, बाजारपेठेत वाढता ओघ
इंदूर, अहमदाबाद आणि नाशिकसह अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी भाव काेसळण्याच्या शक्यतेमुळे शेतातून कच्चा कांदा बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. जयपूरचे कांद्याचे ठाेक व्यापारी शिवशंकर शर्मा म्हणाले, अलवर, झालावाड, नीमच व मंदसाैरचा कांदाही येत हाेता, मात्र त्याचा दर्जा नाशिकच्या तुलनेत कमी चांगला आहे. भाेपाळच्या कराेंद बाजारपेठेचे सचिव राजेंद्रसिंह बघेल म्हणाले, अाॅक्टाेबरच्या अखेरपर्यंत लावलेला कांदा बाजारात येत आहे. मात्र, सध्या कच्चा कांदा आणला जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.