आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपवाद वगळता, प्रत्येक पेशात नैतिकता गरजेची आहे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवारी एका बातमीवरून लक्षात आले की, २०१८ मध्ये देशात केवळ हेल्मेट न घातल्याने ४३ हजार ६०० दुचाकी चालकांचे मृत्यू झाले. २०१७ च्या तुलनेत ही संख्या २१ टक्के जादा आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा हवाला देताना या अहवालात सांगण्यात आले आहे की, हेल्मेट घातल्याने गंभीर जखम होण्याची जोखीम ७० टक्क्यांपर्यंत आणि मृत्यूची भीती ४० टक्के कमी होते. या अहवालात अन्य क्षेत्रांबाबत फार काही सांगितले गेले नाही. पण मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे सल्लागार आणि मेट्रोमॅन नावाने प्रसिद्ध ई. श्रीधरन जे काही सांगतात ते कोणी सांगत नाही. ते म्हणतात की, “शिक्षण क्षे़त्रात टॅलेंट आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात क्षमतांची कमतरता असल्यानेच हे असे रस्ते अपघात होत आहेत. अशा दुर्घटनांमध्ये जे मृत्यू होतात, त्याला कारण म्हणजे रस्त्यांचे खराब डिझाइन आणि त्यांची वाईट देखभाल कारणीभूत आहे. ’ केरळच्या कोझिकोडमध्ये मंगळवारी ‘इंजिनिअरिंग डे’ समारंभाचे उद्घाटन करताना ते म्हणाले की, इंजिनिअरिंगचे शिक्षण आणि या प्रोफेशनमधील कामाचे नियमन करण्यासाठी एक वैधानिक व्यावसायिक संस्था असणे गरजेचे आहे. ती नसल्यामुळेच अशा गंभीर चुका होत आहेत. देशात चांगले इंजिनिअर नसण्याची काय किंमत चुकवावी लागते हे तुम्हाला माहीत आहे काय?’श्रीधरन यांनी इंजिनिअर्सच्या अधिमान्यतेसंदर्भात अशी संस्था स्थापन करण्यासाठी मोदी यांना पत्र लिहिले आहे. दोन वर्षांपूर्वी मनुष्यबळ विकास मंत्र्यांसमोर आपण प्रोफेशनल इंजिनिअर्स बिलच्या मसुद्याचा विषय मांडला असून हा मसुदा आयआयटी मद्रासचे माजी संचालक एम.एस. अनंत यांच्या अध्यक्षतेखालील कमिटीने तयार केला असल्याचे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.  यादरम्यान अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) एक नवी कल्पना सुचवली आहे. यानुसार इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्सना आपले ग्रॅज्युएशन पूर्ण होण्यापूर्वी काही अॅक्टिव्हिटी पाॅइंट पूर्ण करावे लागतील, ज्याच्याशिवाय डिग्री दिली जाणार नाही.  विद्यार्थ्यांना हे अॅक्टिव्हिटी पॉइंट ग्रामीण क्षेत्रात काम केल्यानंतर दिले जातील. तसेच त्यांना शहर व राज्यातील लोकांची समस्या सुटेल असे तांत्रिक संशोधन करून दाखवावे लागेल. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला कमीत कमी ९० तास समाजाचे भले करणाऱ्या कामासाठी द्यावे लागतील. हा त्यांच्या आठव्या सेमिस्टरचा भाग असेल.  एआयसीटीईद्वारे निश्चित करण्यात आलेल्या या १५ गोष्टींमध्ये पुढील कामे सामील असतील. - उच्च तांत्रिक शिक्षणात मुलांचे प्रवेश वाढवून चांगले रिझल्ट लागण्यासाठी स्थानिक शाळांना मदत करणे, गावांचे उत्पन्न वाढवण्यासाठी व्यावहारिक प्रस्ताव तयार करणे, टिकाऊ जलव्यवस्थापन प्रणाली विकसित करणे, नावीन्यपूर्ण पद्धतीने पर्यटनाला प्राधान्य देणे, उपयुक्त टेक्नॉलॉजीचा प्रसार करणे, वीजबचत, ग्रामीण लोकांचे कौशल्य वाढवणे, १०० टक्के डिजिटल व्यवहार, सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील योगदानासाठी महिलांना मार्गदर्शनासाठी क्लबची स्थापना, कचऱ्याचा निचरा, ग्रामीण वस्तूंच्या मार्केटिंगसाठी मदत, अन्नाचे पॅकेजिंग, ऑटोमेशन, ग्रामीण पातळीवर जागरूकतेसाठी मदत करणे, डिजिटल इंडिया किंवा स्किल इंडिया किंवा स्वच्छ भारत इंटर्नशिप यात सहभाग, ज्यात सुटीच्या दिवशी विद्यार्थी यात भाग घेऊ शकतात.   

फंडा  असा :  आम्हाला प्रत्येक क्षेत्रात जर नैतिकता हवी असेल तर विद्यार्थ्यांना समाजाचे भले करणाऱ्या कामांचा परिचय करून द्या, तरच ते नैतिकता कायम ठेवतील.

बातम्या आणखी आहेत...